India vs Bangladesh 2nd ODI: भारतीय संघाला बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासह टीम इंडियाने मालिका 2-0 ने गमावली आहे. भारताच्या अनेक स्टार खेळाडूंनी अतिशय खराब खेळ दाखवला. या खेळाडूंमुळेच खरतर भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
७ डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवात केल्यानंतरही त्यांच्या संघाने भारतासमोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला केवळ २६६ धावा करता आल्या. त्यामुळे बांगलादेशने ५ धावांनी हा सामना जिंकत मालिका नावावर केली आहे.
टीम इंडियाच्या पराभवात हे 5 स्टार खेळाडू मोठे दोषी ठरले आहेत. विराट कोहलीसोबत शिखर धवन सलामीला उतरला, पण तो टीम इंडियाला दमदार सुरुवात करू शकला नाही. या सामन्यात तो फारच फ्लॉप दिसला. त्याने 10 चेंडूत फक्त 8 धावा केल्या आहेत.
दुसऱ्या वनडेत मोहम्मद सिराज चांगलाच महागात पडला. त्याने 10 षटकात 73 धावा दिल्या. त्याच्याविरुद्ध विरोधी फलंदाजांनी खूप धावा केल्या. याशिवाय फलंदाजीतही तो आपली ताकद दाखवू शकला नाही. त्याला फारश्या विकेट्सही घेता आल्या नाहीत. त्यामुळे तोही ह्या पराभवाला जबाबदार आहे.
पहिल्या वनडेनंतर विराट कोहलीला दुसऱ्या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. त्याने 5 धावा केल्या. टॉप ऑर्डर लवकर बाद झाल्यानंतर मधल्या फळीवर दबाव आला. रोहीत जखमी असताना विराटवर मोठी जबाबदारी होती पण तो आपली जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही.
भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सपशेल अपयशी ठरला. जेव्हा टीम इंडियाला सर्वाधिक धावांची गरज होती. त्यानंतर संघाची जबाबदारी मध्येच सोडून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने केवळ 14 धावा केल्या.
शार्दुल ठाकूरला गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही कमाल दाखवता आली नाही. त्याने 10 षटकात 47 धावा दिल्या आणि एकही बळी मिळवता आला नाही. त्याचवेळी फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून केवळ 7 धावा निघाल्या. त्याच्या खराब खेळामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
भारतासाठी या सामन्यात शिखर धवनसह विराट कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले. पण दुसऱ्याच षटकात विराट कोहली बाद झाला. त्यानंतर विकेट्स पडतच गेल्या. सातत्याने विकेट पडल्यामुळे टीम इंडियाने अवघ्या ६५ धावांवर ४ फलंदाज गमावले होते.
महत्वाच्या बातम्या
Sunil Gavaskar : सुनील गावसकर शिखर धवनच्या बाजूने बोलत बीसीसीआयला फटकारले, म्हणाले -“तुम्ही त्याची प्रतिभा वाया घालवत आहात”,
राज्यपाल कोश्यारी पुन्हा सापडले अडचणीत? मॉडेलचे राजभवनातील ‘ते’ फोटो तुफान व्हायरल
भाजपचा खेळ खल्लास! आपने उखडली १५ वर्षांची सत्ता; केजरीवाल पुन्हा ठरले मोदींवर भारी