Share

pune  : ट्रकच्या धडकेत संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त, पती-पत्नी आणि चिमुकल्याच्या मृत्यूमुळे पुणे हादरलं

sabale family

sabale family car accident in pune  | गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहे. अनेकांना तर अपघातात आपला जीवही गमवावा लागत आहे. अशात पुण्याच्या पाटसमधून एक हृदयद्रावक घटनासमोर आली आहे. या ठिकाणी एका अपघातात पती-पत्नीसह त्यांच्या मुलानेही जीव गमावला आहे.

पाटस-कुसेगाव रस्त्यावर भीमा पाटस कारखाना आहे. या कारखान्याच्या परिसरात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

संतोष साबळे, रोहिणी साबळे आणि त्यांच्या पाच वर्षांचा मुलगा गुरु साबळे या तिघांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपुर्ण पाटस परिसरात शोककळला पसरली आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलिस अधिकारी करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुसेगाव येथून साबळे कुटुंबीय दुचाकीवरुन येत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात खुपच भयानक होता. त्यामुळे पती-पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला होता. मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोकही तिथे मदतीसाठी धावून आले.

तसेच घटनास्थळापासून जवळ असलेल्या पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे हे सुद्धा तिथे आले. ट्रक चालक हा तिथून पळून गेला होता. तिथे पाहिले असता पती-पत्नी मृत अवस्थेत होते. तर मुलगा गंभीर जखमी झाला होता.

त्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. आता पोलिस त्या ट्रक चालकाचा शोध घेत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पाटसचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे हे करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-
shinde fadanvis government : कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला पहिला मोठा धक्का, दिला ठाकरेंना दिलासा देणारा ‘हा’ मोठा निर्णय
जुळ्या बहिणींसोबत लग्न करणे पडले महागात! पोलिसात तक्रार, गुन्हा दाखल; वाचा नेमकं काय घडलं…
udayanraje bhosle : राज्यपालांवर पांघरून घालणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? उदयनराजेंनी भाजप नेत्यांना जाहीर झापले

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now