sushma andhare  : सुषमा अंधारे काहीही बोलते, तिच्या मेंदूला नारू झालाय…, तिला बोलायला ठेवलय की भुंकायला?

mns leader angry on sushma andhare  | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना खालच्या पातळीचे वक्तव्य केले आहे. इतकंच नाही, तर त्यांनी सुषमा अंधारे यांचा एकेरी उल्लेख सुद्धा केला आहे.

प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे काहीही बोलते तिच्या मेंदूला काय नारु झालाय का? अशी वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना प्रकाश महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुषमा अंधारे यांची सभा कालच झाली याबाईला काय बोलावं? तिला बोलायला ठेवलंय की भुंकायला? असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.

इतके वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीचा मजला चढला नाही. पण कृष्णकुंजचा चढला, असं ती म्हणाली. हे बोलण्याआधी तिने आपल्या मालकाला विचारायला हवं ना? मी असं बोलू की नको हे सुषमा अंधारेने विचारायला हवं होतं, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.

सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरे यांना लवकरच महिलांच्या बंडाला सामोरे जावे लागणार आहे. काल परवा मुस्लीम झाल्यासारखं सुषमा अंधारे आदाब आदाब करत फिरत होत्या, असा टोलाही प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारे यांना टोला लगावला आहे. तसेच राज ठाकरेंना पुत्र मोह आडवा येतो, असे त्या म्हणाल्या होत्या. पण सुषमा अंधारे यांना पुत्र मोह होऊ शकत नाही, कारण त्यांची अडचण वेगळी आहे, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.

तसेच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी जातीयवादाचे राजकारण करते असा आरोप केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंचे आरोप हास्यस्पद असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, तुम्ही जातीयवादी नाही हे सिद्ध करुन दाखवा. त्यांच्या पक्षात विशिष्य जातीची लोकं आहे, हे दिसून येतं.

महत्वाच्या बातम्या-
Sanjay Raut : उदयनराजे शिवसेनेत प्रवेश करणार? संजय राऊतांच्या विधानाने राजकारणात खळबळ
Uttar Pradesh : नवरदेवाने स्टेजवरच घेतले नवरीचे चुंबन; नवरी मुलीने भर मंडपातून नवरदेवासकट वऱ्हाडींनाही हाकलले
samanth prabhu : गंभीर आजाराने त्रस्त समंथाची प्रकृती प्रचंड खालावली; उपचारासाठी तातडीने पाठवावे लागले ‘या’ देशात