ravi shastri shocking statement on virat and rohit भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक हैराण करणारे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, विराट कोहली, रोहित शर्मासारखे काही खेळाडू हे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहतात. पण शिखर धवन हा चांगली कामगिरी करुनही त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे.
रवी शास्त्री यांना वाटते की विराट कोहलीसारखे बहुतेक खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात राहतात, तर अनुभवी सलामीवीर शिखर धवन खेळाडू आणि कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या धवनने पहिल्या सामन्यात ७७चेंडूत ७२ धावा केल्या आणि शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी १२४धावांची भागीदारी केली.
शिखर धवनच्या या खेळीने रवी शास्त्री खुपच प्रभावित झालेले दिसले. ते म्हणाले की, शिखर धवन हा खूप अनुभवी खेळाडू आहे. त्याने चांगली कामगिरी करुनही त्याला मान-सन्मान दिला जात नाही. खरे सांगायचे तर, ‘स्पॉटलाइट’ विराट कोहली आणि रोहित शर्मावर कायम आहे. पण शिखर धवनकडे पाहिले तर तो चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. त्याने अनेक मोठे रेकॉर्ड सुद्धा केले आहे.
शास्त्री म्हणाले की, ३६ वर्षीय सलामीवीर शिखर धवनकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांविरुद्ध सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. शास्त्री यांनी सुरुवातीच्या काळात धवनला ‘गन प्लेअर’ असे संबोधले होते. न्य़ुझीलंड दौऱ्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, तिथे बरेच खेळाडू आहेत. पण त्यामध्ये शिखर धवनचा अनुभव महत्वाचा असेल.
धवनच्या वनडेत ६५०० हून अधिक धावा आहेत. धवन संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ नाही, त्याने यापूर्वीही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेविरुद्ध २-१, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-१ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ३-० असा विजय मिळवला. चांगल्या कामगिरीमुळे त्याला पंजाब किग्सचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा न्युझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना पार पडला आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ३०६ धावा केल्या. या सामन्यात शिखर धवनने महत्वाची भूमिका निभावली. त्याने ७२ धावा आणि श्रेयस अय्यरने ८० धावा केल्यामुळेच भारतीय संघाला ३०६ धावांंचा मोठा स्कोर उभा करता आला. पण खराब गोलंदाजीमुळे भारताने हा सामना गमावला.
महत्वाच्या बातम्या-
ind vs nz : ‘या’ तीन खेळाडूंमुळेच झाला भारताचा न्युझीलंडविरुद्ध पराभव, संघातून वगळण्याची होतेय मागणी
shikhar dhawan : शिखर धवनची ‘ही’ सर्वात मोठी घोडचूक भारताला नडली; गमवावा लागला हातातला सामना
पुन्हा दिसली भारतीय गोलंदाजीची लायकी; ३०७ धावांचे आव्हान असूनही न्युझीलंडने सहज जिंकला सामना