Share

Iran : शाब्बास पोरांनो! तुम्हाला काहीही शिक्षा मिळो, पण घरी गेल्यावर इराणच्या माता-भगिनी अभिमानाने तुमचे चुंबन घेतील

iran football team

iran team refuse sign national anthem | फिफा विश्वचषकात इंग्लंड आणि इराण यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीच गदारोळ झाला होता. खरे तर इराणच्या संघाने सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. देशात सरकारविरोधात होत असलेल्या निदर्शकांच्या समर्थनार्थ इराण संघाने हा निर्णय घेतला आहे.

त्या खेळाडू्ंनी महिलांसाठी लागू असलेल्या कठोर ड्रेस कोडला विरोध करण्यासाठी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. इराणच्या या संघाचे जगभरात कौतूक होत असले तरी त्यांच्या देशात त्याची काय स्थिती होईल याचा विचार करुन अनेकांची चिंता वाढली आहे. त्यांना देशात गेल्यावर कोणतीही शिक्षा मिळो, पण त्यांनी जे केलं आहे, त्याचा त्यांच्या माताभगिनींना खुप अभिमान असेल आणि ते नक्कीच त्यांचे चुंबन घेतील.

कर्णधार अलीरेझा जहाँबख्शने सांगितले की, इराणमधील सरकारविरोधी निदर्शकांच्या समर्थनार्थ राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. संघाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला होता. महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील ही निदर्शने मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

महसा अमिनी ही वायव्य इराणमधील साकेज शहरातील कुर्दिश महिला होती.  तीन दिवस कोमात राहिल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी तेहरानमधील रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता. ज्या वेळी इराण पोलिसांनी तिला अटक केली, त्यावेळी ती कुटुंबासह तेहरानला आली होती.

अमिनीने ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याचा आणि हिजाब घातला नसल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. रिपोर्टनुसार, पोलिसांनी अमिनीच्या डोक्यावर लाठीमार केला आणि तिचे डोके त्यांच्या गाडीवर आदळले. महसा अमिनी यांना मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता.

पोलिसांनी मात्र या गोष्टीला नकार दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिनी यांना हृदयविकाराचा झटका आला होता, तर अमिनीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती बऱ्यापैकी निरोगी होती. साकेज येथे अमिनी यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा हजारो महिलांनी त्यांचे हिजाब फेकून सरकारविरोधी घोषणा दिल्या.

महत्वाच्या बातम्या-
suryakumar yadav: न्यूझीलंड टी-20 मालिकेनंतर सूर्यकुमार यादवसाठी आली आनंदाची बातमी, हार्दिकचाही मोठा फायदा
kajal Jawla: कडक सॅल्यूट! बायकोचे IAS व्हायचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी धुनी धुतली, भांडी घासली, स्वयंपाक केला
bhagatsingh koshyari : मोठी बातमी! भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन होणार हकालपट्टी? 

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now