suryakumar yadav : न्युझीलंडमध्ये आलं सूर्याचं वादळ, नाबाद शतक ठोकत भारताला मिळवून दिला दणदणीत विजय

suryakumar yadav hit century  | सूर्यकुमार यादवचे शतक आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी अतिशय जबरदस्त खेळ दाखवला. सूर्यकुमार यादवच्या घातक फलंदाजीमुळे आणि गोलंदाजांमुळे टीम इंडियाचा विजय झाला आहे.

भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात फिन ऍलनला बाद केले. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाकडून दीपक हुड्डाने खुप चांगली कामगिरी केली. त्याने २.५ षटकात १० धावा देत ४ बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल यांनी २-२ विकेट्स त्यांच्या खात्यात जमा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली. गोलंदाजांमुळेच टीम इंडियाने ६५ धावांनी विजय मिळवला.

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने संपूर्ण मैदानावर फटकेबाजी केली. सूर्यकुमार यादवने केवळ ५१ चेंडूत १११ धावा केल्या, ज्यात ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याच्यामुळेच टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली. इशान किशनने ३६ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्याने १३-१३ धावांचे योगदान दिले. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला जिंकण्यासाठी १९२ धावांचे लक्ष्य दिले.

सामन्यात पुन्हा एकदा ऋषभ पंत फ्लॉप ठरताना दिसला. पॉवर-प्लेच्या अंतिम षटकात, ऋषभ पंतने (६) फर्ग्युसनच्या ऑफ-स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर शॉर्ट खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू वरच्या बेलवर आदळला, ज्यामुळे तो बाद झाला.

त्यानंतर सूर्यकुमारने आक्रमक खेळी खेळण्यास सुरुवात केली. त्याने ३६० डिग्रीमध्ये शॉट्स मारत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभी करुन दिली. त्याने टी २० क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

न्यूझीलंडकडून गोलंदाज टीम साऊदीने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने त्याच्या शेवटच्या षटकात हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना लागोपाठ बाद करून हॅटट्रिक घेतली. पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. कारण सूर्यकुमार यादवने तोपर्यंत मोठी खेळून टाकली होती.

महत्वाच्या बातम्या-
अजित आगरकरवर BCCI सोपवणार महत्वाची जबाबदारी; महाराष्ट्राला मिळणार मोठा बहुमान
Nikhil wagle : “भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र बंद करुन टाका”
UK : जोडप्याला किचनच्या फरशीखाली सापडला ३०० वर्षांपुर्वीचा खजिना, रात्रीत झाले ‘इतक्या’ कोटींचे मालक