चित्रपट सृष्टीतील कलाकारांची मुलं ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात पदार्पण करतात. तर काही कलाकार मंडळी मात्र पुर्णपणे याला अपवाद ठरताना पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध आणि उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षेची (Sharad Ponkshe ) मुलगी चर्चेत आली आहे.
चित्रपट , नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. तसेच, कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्यांची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शरद पोंक्षे यांच्मा लाडक्या लेकीने वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्याची माहिती पोंक्षे यांनी फेसबुक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे. त्यांनी पोस्ट करणाना लिहिले की, ‘सिद्धी शरद पोंक्षे आज प्रायव्हेट पायलट झाली. असंख्य अडचणीतून मार्ग काढत ती इथपर्यंत पोहोचली. अभिनंदन सिद्धी.’
तसेच, ‘2019 मध्ये माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. रुग्णालयात येऊन, कॉलेजचा अभ्यास करून एवढ्या टेंशनमध्ये असतानाही पिल्लूनं 87 टक्के मार्क बारावी विज्ञान शाखेत मिळवले. अभिमान वाटला मला आणि सतत वाईट बातम्या चहूबाजूंनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय’, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सध्या त्यांच्या मुलीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
दरम्यान, जुल्लै महिन्यात शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट केली होती. ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ अशी पोस्ट सिद्धीला मुंबई विमानतळावर निरोप देताना शेअर केली होती. बारावीत सिद्धीला विज्ञान शाखेत ८७ टक्के गुण मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या –