गंगाखेड- परभणी हा महामार्ग वाहन चालक, मालक व प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा आहे. गंगाखेड – परभणी या महामार्गाची अवस्था फार खराब झाली आहे. नेमक खड्ड्यात रस्ता कि रत्यावर खड्डे हेच समजत नाही. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहण करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या रस्त्याची तक्रार परभणीच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी यापूर्वी देखील केली होती. परंतु, अद्यापही केंद्र सरकारकडून यावर कुठलीच कारवाई न झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या उंचावल्या आहेत. हा महामार्ग तयार करण्यासाठी तब्बल १८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
मात्र, आता या महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे कंत्राटदाराला महामार्गवर पुन्हा पॅचअप करण्याची वेळ आली आहे. तसेच हा महामार्ग सिमेंट काॅंक्रीटचा असुन त्यावर डांबर टाकण्यात आले आहे. त्यामुळे त्या महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी गंगाखेड -परभणी महामार्गला मंजूरी दिल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली होती.
या कामासाठी तब्बल १८९ कोटी रुपये देण्यात आले होते. ४० किलोमीटरचे काम पुर्ण करण्यात आले असून त्या कामासाठी २०० कोटी रुपये खर्च झाला असल्याचे सांगितले जात आहे. या महामार्गावरील मधल्या पट्टीवर रबर टाकते गरजेचे असते. पण रबर खराब होत आहे. या कारणामुळे कंत्राटदाराकडून चक्क सिमेंटच्या महामार्गाला डांबरीकरणाचे ठिगळे लावली जात आहेत.
तसेच फौजिया खान यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने महामार्गाची पाहणी केली असुन पुढील प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे समितीने अहवाल कुणाकडे सादर केला आणि कंत्राटदारावर काय कारवाई केली? याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
दरम्यान, मंत्री नितीन गडकरी जे पारदर्शकतेचा दावा करतात त्यात किती तथ्य आहे. असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता नितीन गडकरी या महामार्गाच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देऊन दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
Mansi Naik: लग्नाच्या दिड वर्षातच अभिनेत्री मानसी नाईक घेणार घटस्फोट? म्हणाली, “आयुष्यचा बेरंग…