court angry on ed in sanjay raut case | शिवसेना नेते संजय राऊतांची अखेर जेलमधून सुटका झाली आहे. ते गेल्या १०० दिवसांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये होते. १०० दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. या जामीन विरोधात ईडीने पुन्हा याचिका दाखल केली होती. पण ती याचिका न्यायालयाने फेटाळली.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच झापले आहे. संजय राऊतांची अटक बेकायदेशीर होती. त्यांना कारण नसताना अटक झाली. त्यांना १०० दिवस तुरुंगात ठेवलं. दोन्ही बाजूंकडून अनेक युक्तीवाद झाले. अनेक सुनावण्याही झाल्या. त्यामुळे दोन्ही आरोपींची अटक कायदेशीर होती हे आम्हाला पटवून द्या, असे म्हणत न्यायालयाने ईडीला सुनावले आहे.
न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने पुन्हा याचिका दाखल केली होती. त्यावेळी ईडीची मागणी स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला. कोर्टाची निरीक्षणे कशाप्रकारे अयोग्य आहे हे पटवून द्या. तुमचा युक्तिवाद पटला तर आरोपीला अटक करा असे आदेश देऊ. पण आता त्यांचा जामीन फेटाळला जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तसेच पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणात म्हाडाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करुन ईडीने म्हाडाच्या कोणत्याच कर्मचाऱ्याला आरोपी केले नाही. घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश व सारंग वाधवान यांनाही ईडीने अटक केली नाही. त्यामुळे कोणतेही कारण नसताना ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. ही खुप गंभीर बाब आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ईडीकडून निवडून कारवाई केली जात असल्याचे दिसत आहे. ईडीच्या कारवाईत असमानता आहे. न्यायालय अशा वर्तवणूकीला पाठबळ देणार नाही. कारण तसे झाले तर सर्वसामन्य व निष्पाप लोकांकडून न्यायालयावर जो विश्वास दाखवला जातो. त्यालाच धक्का बसेल, असे गंभीर निरीक्षणे न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी नोंदवले आहे.
दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी केलेल्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊतांवर होता. त्या प्रकरणात त्यांनी प्रवीण राऊत यांची साथ दिली होती, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता. त्यामुळे गेल्या १०२ दिवसांपासून ते तुरुंगात होते. मात्र बुधवारी कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
uddhav thackeray : जामीनानंतर उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना थेट फोन म्हणाले, संजय…
Sanjay Raut : एकच शिवसेना खरी, बाकी सगळ्या धोतराच्या कडू बिया; जेलमधून बाहेर येताच सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी
राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने खरेदी केले ‘या’ 6 कंपन्यांचे शेअर्स; होणार बक्कळ कमाई