kl troll because he not wish virat kohli | भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर केएल राहूल गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्याला टी २० वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला वारंवार ट्रोल केले जाते. अशात आता पुन्हा एकदा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
यावेळी केएल राहूल त्याच्या फलंदाजीमुळे नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ट्रोल झाला आहे. झाले असे की, आज भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याला अनेक क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आज केएल राहूल डेट करत असलेल्या आथिया शेट्टीचाही वाढदिवस आहे.
केएल राहूलने एक ट्विट करत आथिया शेट्टीला शुभेच्छा दिल्या. पण विराट कोहलीसाठी त्याने फक्त स्टोरी टाकली आहे. त्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त करत त्याला ट्रोल केले आहे. तसेच काही चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्यामुळे त्या सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या आहे.
Happy birthday to my 🤡 you make everything better ♥️ pic.twitter.com/7EAK5A0qhR
— K L Rahul (@klrahul) November 5, 2022
केएल राहुलच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. एका यूजरने लिहिले की, राहुल भाई, विराट भाईच्या वाढदिवसाची पोस्ट कुठे आहे. बरंय, मुलगी सापडली तर मित्राला विसरलेच. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, वाह मित्रा, चांगली मैत्री निभावलीस.
एका चाहत्याने देख रहा है बिनोद, गर्लफ्रेंडच्या अफेअरमध्ये लोक मैत्री कशी विसरतात असेही लिहिले. अशाप्रकारचे कमेंट्स लोकांनी केले आहे. विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर रांग लागलेली असताना केएल राहूलने विराटबद्दल कोणतीही पोस्ट न केल्यामुळे चाहते भडकले आहे.
विराट कोहली आपला ३४ वा वाढदिवस ऑस्ट्रेलियात साजरा करत आहे. तिथे सुरू असलेल्या टी २० वर्ल्ड कपमध्ये किंग कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली २२० धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोहली या विश्वचषकात आतापर्यंत फक्त एकदाच बाद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli: ३४ वर्षांचा झाला विराट पण अजूनही आहे किंग, वाचा त्याच्या कारकिर्दीतले १० मोठे विक्रम
Elon Musk: एलॉन मस्कचा आता भारतीय कर्मचाऱ्यांना दणका, संपूर्ण टीमच टाकली काढून, म्हणाला, ऑफिसला येत असाल तर..
ajit pawar : “ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणं ही बेईमानी”, अजित पवार स्पष्टच बोलले