kl rahul share athiya shetty photo | भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि उपकर्णधार केएल राहुल नेहमीच चर्चेत असतो. कधी तो त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत असतो, तर कधी त्याच्या लव्ह लाईफमुळे. तो बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आथिया शेट्टीला डेट करत आहे. तिच्यासोबत त्याचे अनेक फोटोही समोर येत असतात.
राहूल लवकरच अथिया शेट्टीसोबत सात फेरे घेणार आहे. सध्याच्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२२ नंतर दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भारतीय उपकर्णधाराने संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती मागितली आहे. त्यावेळी तो लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
आता पुन्हा एकदा राहूल चर्चेत आला आहे. कारण त्याने आथिया शेट्टीसोबतचा फोटो पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. केएल राहूलने तीन फोटो पोस्ट केले आहे. त्या तिन्ही फोटोंमध्ये केएल राहूल आथिया शेट्टीसोबत दिसून येत आहे. तसेच त्याने एक खास कॅप्शनही दिले आहे.
कॅप्शनमध्ये राहूलने लिहिले आहे की, हॅप्पी बर्थ डे माय जोकर, तुच माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी चांगल्या केल्या आहेत. केएल राहूलची ही पोस्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. काहीच वेळात या फोटोला ११ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. तसेच अनेकांनी फोटोवर कमेंट्सही केल्या आहे.
केएल राहुल आणि अथिया बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही. पण भारताचा स्टार केएल राहुल आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ नंतर त्याच्या दीर्घकाळाच्या नात्यानंतर आता ते लवकरच लग्न करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
shivsena : “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार…”, आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
Amruta Fadanvis : भिडेंच्या विधानावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, “मला गुरुजींचा खूप….
sachin tendulkar : मुंबई ते गोव्याच्या रोड ट्रिपसाठी सचिनने निवडली ‘ही’ भन्नाट कार, किंमत आणि फिचर्स ऐकून शॉक व्हाल