Share

sachin tendulkar : मुंबई ते गोव्याच्या रोड ट्रिपसाठी सचिनने निवडली ‘ही’ भन्नाट कार, किंमत आणि फिचर्स ऐकून शॉक व्हाल

sachin tendulkar

sachin tendulkar kia carens car  | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर त्याच्या कारच्या प्रेमासाठी नेहमीच ओळखला जातो. क्रिकेट लीजेंडकडे अनेक लक्झरी कार्स आहेत, सचिन तेंडुलकर सध्या रोड ट्रिप करत असल्याचे दिसत आहे. कारण तो वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत आहे.

फेरारी, मर्सिडिजसारख्या कार असताना सचिन तेंडूलकर एका वेगळ्याच कारने प्रवास करताना दिसून येत आहे. सचिनने आपली महागडी घ्यायची सोडून तो Kia Carens MPV मध्ये रोड ट्रिपला गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ही कार सुद्धा खुप चर्चेत आली आहे.

सचिनने त्याच्या रोड ट्रिपचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो रस्त्याच्या कडेला चहाचा कप पिताना दिसत आहे. तेव्हा तो पिळगाव-गोवा या एक्सप्रेस हायवेवर असतो. या एक्स्प्रेस वेचा वापर मुंबईहून गोव्याकडे जाणारे लोक करतात.

सचिन त्याच्या कुटुंबासह रोड ट्रिपवर आहे आणि त्याने ट्रिपसाठी MPV, Kia Carens, ही कार निवडली आहे. करेन्स ही निवडण्यामागे काही कारणे सुद्धा आहेत. या कारमध्ये अनेक हैराण करणारे फिचर्स आहेत. चला तर मग जाणून घेऊया नक्की त्यात काय फिचर्स आहे.

ही कार १५ फेब्रुवारीला लाँच करण्यात आली होती. तिची किंमत ८.९९ लाख रुपये आहे. त्यानंतर तिची बाजारातील मागणी वाढत असल्यामुळे तिची किंमत ९.५९ लाख करण्यात आली. ही कार ६ आणि ७ सीटर्स अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सुरक्षेच्या बाबतही ही खुप चांगली आहे. यामध्ये ६ एअरबॅग्स आहे. तसेच इलेक्र्टॉनिक स्टेबिलिटी मॅनेजमेंट, ब्रेक असिस्ट, डाऊनहिल ब्रेक कंट्रोल, अँटी-लोक ब्रेकींग सिस्टिमही या कारमध्ये आहे.

या कारचे इंजिनही खुप पावरफुल आहे. यामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन, १.५ लीटर डिझेल इंजिन, १.४ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. तसेच ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटीक गिअरबॉक्सचा पर्याय सुद्धा मिळतो. टर्बो पेट्रोल इंजिन केवळ ७ स्पीड डुअल क्लच ऑटोमॅटीक गिअरबॉक्ससह पॅडल शिफ्टर्ससह येतात.

दरम्यान, किया करेन्सशिवाय सचिन तेंडुलकरकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. पोर्श केयेन, बीएमडब्ल्यू आय ८, निसान जीटीआर, फेरारी ३६० मोडेना, मर्सिडीज-एएमजी सी३६, बीएमडब्ल्यू एक्स५ एम अशा अनेक महागड्या कार त्याच्या घरात आहेत.

महत्वाच्या बातम्या-
Liton Das : भगवान कृष्णाचा कट्टर भक्त आहे ‘हा’ बांगलादेशी खेळाडू, भारताविरुद्ध केली होती धडाकेबाज फलंदाजी
अबब..! भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला ‘वाघ्या पाकट’ मासा; फोटो पाहून व्हाल थक्क
Taxi: ..अन् चालत्या टॅक्सीतच महिलेने दिला बाळाला जन्म, जॅकेटमध्ये बाळाला गुंडाळून पोहोचली हॉस्पिटलमध्ये

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now