Share

Indian team : झिम्बाब्वेने भारताला हरवले, तर झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करणार; प्रसिद्ध अभिनेत्रीचे थेट चॅलेंज

Team India

pakistani actress challenge to zimbabwe defeat indian team   सध्या टी २० वर्ल्डकप सुरु आहे. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ खुप चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. भारताचे आतापर्यंत चार सामने झाले असून त्यापैकी ३ सामने भारताने जिंकले आहे. भारताने पाकिस्तान, नेदरलँड्स आणि बांगलादेशला पराभूत केले आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताने आपले सेमी फायनलमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. पण अजूनही काही सांगता येत नाही अशी स्थिती आहे. भारताचा पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध असणार आहे. हा सामना जिंकला तर भारतीय संघाचे सेमी फायनलमधील स्थान पक्के होणार आहे.

तसेच भारत पराभूत झाला, तरच पाकिस्तान सेमी फायलनमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहते भारताच्या पराभवाची वाट पाहत आहे. अशात पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्री सेहर शिनवरीने एक ट्विट केले आहे. झिम्बाब्वेने भारताला हरवले तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेल, असे तिने म्हटले आहे.

सेहर शिनवरी हे सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. ती अनेकदा क्रिकेटवर ट्विट करताना दिसून येत असते. बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा सामना होता. तेव्हाही ती ट्विट करत होती. भारत हा सामना हरेल असे सेहर म्हणत होती. आता तिच्या एका नव्या ट्विटने खळबळ उडवून दिली आहे.

झिम्बाब्वेच्या संघाने जर भारतीय संघाला पराभूत केले, तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेल, असे ट्विट सेहर शिनवरीने म्हटले आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. तसेच भारतीय संघाबाबत असे वक्तव्य केल्यामुळे भारतीय चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे.

एकाने म्हटले आहे की, मला वाईट वाटत आहे की तु आयुष्यभर एकटीच राहणार आहे. तर एकाने म्हटले की, बांगलादेशला हरवल्यानंतर तु तुझे ट्विटर अकाऊंट डिलीट करायला हवे होते. अशा प्रकारच्या कमेंट्स करत अनेकांनी या अभिनेत्रीला ट्रोल केले आहे.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now