Share

Rohit Sharma: अनेकवेळा संधी देऊनही ‘हा’ दिग्गज खेळाडू होतोय फ्लॉप, लवकरच रोहित संघातून काढणार बाहेर?

Rohit Sharma: टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये टीम इंडियाचे सेमीफायनलमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. टीम इंडियाने अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध विजय नोंदवून पॉइंट टेबलमध्येही पहिले स्थान मिळवले आहे. मात्र टीम इंडियाच्या एका खेळाडूने या स्पर्धेत अद्याप आपली छाप सोडलेली नाही. हा खेळाडू सतत फ्लॉप होत आहे. World Cup, Team India, Wicketkeeper, Dinesh Karthik,Rohit Sharma

T20 विश्वचषक 2022 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक हा रोहित शर्माची पहिली पसंती राहिला आहे. दिनेश कार्तिक प्रत्येक सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा एक भाग राहिला आहे, परंतु एकाही सामन्यात तो फलंदाज म्हणून काही विशेष करू शकला नाही. बांगलादेशविरुद्धही तो 5 चेंडूंत केवळ 7 धावांची खेळी करू शकला. त्याची ही खराब कामगिरी त्याच्यासाठी आगामी काळात मोठे टेन्शन बनू शकते.

2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत दिनेश कार्तिक आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. दिनेश कार्तिकने आतापर्यंत खेळलेल्या 3 डावांमध्ये 4.66 च्या सरासरीने केवळ 14 धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही 15 चेंडूंचा सामना केला होता, मात्र तो 40 च्या स्ट्राइक रेटने केवळ 6 धावा करू शकला होता.

ऋषभ पंतला टी20 विश्वचषक 2022 मध्ये आतापर्यंत एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याचवेळी, कार्तिक टीम इंडियाच्या अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही, अशा स्थितीत ऋषभ पंतला येत्या सामन्यांमध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. ऋषभ पंतने टीम इंडियासाठी आतापर्यंत 62 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 24.02 च्या सरासरीने केवळ 961 धावा केल्या आहेत.

दिनेश कार्तिक 2010 च्या T20 विश्वचषकानंतर टी-20 विश्वचषक सामना खेळला आहे. पहिल्या T20 विश्वचषकात (2007) त्याने चार सामने खेळले. यानंतर 2010 च्या विश्वचषकात दोन सामने खेळण्याचे त्याच्या नशीबी आले. या 6 सामन्यांमध्ये त्याला पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. यानंतर त्याने अनुक्रमे 11, 17, 0, 16 आणि 13 धावांची खेळी खेळली. त्याच्या सातव्या T20 विश्वचषक सामन्यात, तो दोन चेंडूत एक धाव घेऊन बाद झाला.

महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli : गौतम गंभीरने पुन्हा मारली पलटी, विराटबद्दल केले हैराण करणारे वक्तव्य; म्हणाला, तो बाबर आणि स्मिथपेक्षा…
t20 World Cup : ‘या’ ५ खेळाडूंनी बांग्लादेशविरुद्ध राखली भारताची लाज, नाहीतर वर्ल्डकपमधून बाहेर झालो असतो
Team India : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चिटींग केली? ‘या’ कारणामुळे होत आहेत गंभीर आरोप

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now