ratan tata : आपण प्रत्येक जण कोणाचे ना कोणाचे फॅन असतोच..! आपण आपल्या फॅनचे अनुकरण करत असतो. जगात असे अनेक मोठे व्यक्तिमहत्त्व आहेत की सर्वच जण त्यांचे फॅन असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे, उद्योजक रतन टाटा..! उद्योग क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे रतन टाटा..!
अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांच्याच परिचयाचे नाव म्हणजे रतन टाटा..! अनेक जण त्यांचे जबर फॅन आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे, आज आम्ही तुम्हाला टाटांच्या एका मराठमोळ्या फॅनबद्दल सांगणार आहोत. टाटांचा हा फॅन फक्त टाटांच्याच वस्तु वापरत आहे.
जाणून घ्या सविस्तर..!
अहमदनगरमधील रवी पाटोळे हे टाटांचे चांगलेच फॅन आहेत. रवी यांच्यावर टाटांचा एवढा प्रभाव पडला आहे की, ते प्रत्येक वस्तु फक्त टाटांचीच वापरतात. एवढंच नाहीतर रवी यांनी जीवनातील प्रत्येक गोष्टीत टाटा यांच्या उत्पादनाला प्राधान्य दिले आहे. सध्या राज्यात रवी यांचीच चर्चा सुरू आहे.
याबाबत बोलताना रवी सांगतात की, २००६ पासून मी टाटा यांचं देशातील समाजकार्यानं मी प्रेरित झालो. एवढंच नाही तर घरात मी मिठापासून चारचाकीपर्यत टाटानं उत्पादन केलेल्या वस्तू खरेदी करतो. ऑनलाईन शॉपिंग देखील मी टाटा क्लिक साईटवरून खरेदी करतो.
तसेच २०११ मध्ये मी टाटाची व्हिस्टा कार खरेदी केली. त्यानंतर दुसरी कार टिगोर म्हणून घेतली. तुम्हालाही वाचून अभिमान वाटेल की, रवी पाटोळे यांनी ५७ भाषेत भारताचा गौरव रतन टाटा हे चित्र कारवर चिटकवलं आहे. एवढंच नाहीतर रवी यांच्या पत्नीने देखील याबाबत काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
याबाबत त्या सांगतात की, आमचे लग्न जमले, तेव्हा मला माझ्या पतीने टाटाचा मोबाईल दिला. सासरी आले तेव्हा माझ्या लक्षात आल की, मिठ, चहा पावडर, डिश या सगळ्या गोष्टी टाटा कंपनीच्या आहेत. सध्या या टाटांच्या फॅनची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी, रात्री नवऱ्याला समोसा खाऊ घातला अन् त्यानंतर…
Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या
bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…