uddhav thackeray group allegation devendra fadanvis | राज्यात सध्या रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी गुवाहटीला जाण्यासाठी पैसे घेतले होते. असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप सिद्ध करुन दाखवा असे सांगितले होते.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं, असेही बच्चू कडू म्हणाले होते. त्यानंतर या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली होती. तसेच आपल्या एका शब्दावर बच्चू कडू गुवाहटीला गेले होते, असे फडणवीसांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच यावर अनेक राजकीय नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता ठाकरे गटही यावरुन आक्रमक झाला आहे. ठाकरे गटातील नेते अनिल देसाई यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले होते. तेव्हा भाजपने आपला बंडखोरांशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता अनिल देसाई आक्रमक झाले आहे. अर्थात हे कशाप्रकारे सुरु होतं हे कळतंय ना. कोणाच्या इशाऱ्यावर हे सर्व सुरु होतं सर्व आता समोर आलं आहे, असे अनिल देसाई यांनी म्हटले आहे.
अर्थात म्हणजेच हे कशाप्रकारे आणि कोण करतंय हे समोर येतंय. कशाप्रकारे या गोष्टी सुरु होत्या हे जनतेला कळतंय. कोणाचे आदेश, कोणाचा शब्द पाळला जातोय, हे समोर येतंय. कोणाच्य इशाऱ्यावर हे सगळं सुरु होतं हेही महाराष्ट्राच्या समोर आलं आहे, असे अनिल देसाई यांनी म्हटले आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी सभागृहात देवेंद्र फडणवीस कसे कलाकार आहे याचं वर्णन केलं होतं.लोकांनाही हे कळलं आहे. सुप्रिम कोर्ट या सर्व गोष्टींची दखल घेणार आहे. त्याप्रमाणे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असेही अनिल देसाई यांनी म्हटले आहे. अनिल देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असताना सोशल मीडियावर ‘गायछाप’ ब्रँड चर्चेत; किस्सा वाचून चकीत व्हाल
bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…
Parag Pingle : ठाकरेंना मोठा धक्का! संजय राठोडांविरुद्ध आंदोलन करणारा ‘हा’ बडा नेताच शिंदे गटात