parag pingle join eknath shinde group | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट आणि दुसरा गट म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे यांच्या गटात अनेक मोठे नेते जाताना दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना धक्केवर धक्के बसत आहे.
अशात उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. तसेच पुढच्या राजकीय कारकिर्दीबाबत आपण कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वैयक्तिक कारणामुळे आपण जिल्हा प्रमुखाचे पद सोडत आहे, असे पराग पिंगळे यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रक देऊनही आपला निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे दिड महिन्यानंतर पराग पिंगळे शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर दिसत आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली आहे.
आपण अजूनही शिवसैनिकच आहोत, असे पराग पिंगळे यांनी म्हटले. तसेच आपली पसंती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे संजय राठोडांच्या हा नंतर हा उद्धव ठाकरेंना यवतमाळमधील दुसरा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले होते. त्या बंडात संजय राठोड हे सुद्धा सामील होते. अशात पराग पिंगळे संजय राठोडांचे विश्वासू आहे. त्यामुळ ते सुद्धा शिंदे गटात जातील अशी चर्चा होती. पण तरीही पराग पिंगळे हे शिवसेनेतच राहिले. इतकंच नाही, तर त्यांनी संजय राठोड यांच्याविरोधात आंदोलनही केले होते.
त्यानंतर मातोश्रीवर झालेल्या अनेक बैठकांमध्येही ते उपस्थित होते. पण गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याचे दिसत होते. त्यांनी पक्षाची कामे करणे सोडून दिले होते. तसेच आपले गाडीवर वाघाचे चिन्ह सुद्धा त्यांनी काढून टाकले होते. त्यामुळे ते शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात जातील अशी चर्चा होती. पण आता ते शिंदे गटातच सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
Machu Nadi: स्वत: जखमी झाला पण ६० जणांचे प्राण वाचवले, मोरबी पुल दुर्घटनेत ठरला हिरो, लोकांनी केलं कौतुक
‘मला वेड्यात काढू शकता पण देवाला नाही’, BCCI ने वारंवार दुर्लक्ष केल्याने खेळाडू संतापला
BCCI च्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झाली २२ वर्षाच्या स्टार खेळाडूची कारकिर्द, संघातून झाली हकालपट्टी