Rishabh Pant : २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या स्पर्धेला सुरुवात केली, तेव्हापासूनच ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये कधी संधी मिळणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्माने ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली आहे.
तसेच काल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना पार पडला असून यात भारताचा प्रभाव झाला आहे. आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात आपले स्थान निर्माण करणाऱ्या कार्तिकच्या आगमनाने पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. विकेट्स किपींगसोबतच फिनिशर म्हणून कार्तिक संघात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी, भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांना पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत विचारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी एक मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, दुर्दैवाने एका संघात केवळ ११ खेळाडू खेळू शकतात.
विक्रम राठोर म्हणाले की, “दुर्दैवाने संघात केवळ ११ खेळाडू खेळू शकतात. मी समजू शकतो की ऋषभ पंत हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि सामन्यात तो कोणत्याही संघाविरुद्ध काय करू शकतो हे आम्ही पाहिले आहे.” त्यामुळे कधीही संधी मिळेल तेव्हा तयार राहा, असा त्याच्यासाठी संदेश आहे.
त्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असणे महत्त्वाचे आहे आणि तो ते करत आहे. तो सतत सरावही करत असतो. त्यामुळे मला खात्री आहे की, त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो त्यासाठी पूर्णपणे तयार असेल.
यावेळी केएल राहुलचा खराब फॉर्म लक्षात घेता भारत ऋषभ पंतला सलामीवीर म्हणून खेळवू शकतो का, असा प्रश्नही भारतीय फलंदाजी प्रशिक्षकाला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “नाही, आम्ही असा विचार करत नाही. राहुल शानदार फलंदाजी करत असून सराव सामन्यातही त्याने चांगली फलंदाजी केली. त्यामुळे आम्ही सध्या अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही.”
महत्वाच्या बातम्या
dinesh kartik : टीम इंडियाला मोठा धक्का, आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ मॅचविनर खेळाडू जखमी
Rohit : पराभवानंतर प्रचंड भडकला रोहीत; ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार, जाहीरपणे काढली खरडपट्टी
IND VS SA : आम्ही स्वताहूनच आफ्रिकेला जिंकण्याची संधी दिली; रोहित शर्माचे सामन्यानंतर धक्कादायक वक्तव्य
ह्रदयाची धडधड वाढवणाऱ्या सामन्यात भारत अखेरच्या षटकात पराभूत, पाकीस्तान विश्वचषकाच्या बाहेर