IND and PAK | दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पाच गडी राखून पराभव झाल्यानंतर, पाकिस्तानला आता ICC T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणे कठीण जात आहे. मात्र, बाबर आझमचा संघ सुपर 12 च्या गट-2 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही आणि तरीही संघ उपांत्य फेरी गाठू शकतो.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला भारताकडून अपेक्षा होत्या. जर भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवलं असतं तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत सहज जाता आलं असतं. बांगलादेशच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर सुपर 12 चा गट 2 अधिक रोमांचक झाला आहे.
रविवारी सुपर 12 च्या ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानच्या विजयानंतर आणि भारताच्या पराभवानंतर, तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की भारत आणि पाकिस्तान आता क्वालिफाय कसे होणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचे भवितव्य आता त्यांच्याच हातात आहे.
रोहित सेना याला आता हलक्यात घेऊ शकत नाही. भारताला आता सुपर 12 च्या ग्रुप-2 मधील त्यांचे दोन उर्वरित सामने बांगलादेशविरुद्ध 2 नोव्हेंबरला आणि 5 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे आहेत. भारत तीन सामन्यांतून चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचा निव्वळ रनरेट +0.844 आहे. तर दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांतून दोन विजयांसह पाच गुणांसह अव्वल आहे आणि त्यांचा रनरेट +2.772 आहे.
सुपर 12 च्या गट 2 चे चित्र पाहता असे दिसत आहे की, ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविण्यासाठी, भारताकडे एकच पर्याय उरला आहे. आपल्या पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानकडून किंवा नेदरलॅंडकडून पराभव झाला तर भारत अव्वल स्थानी येईल.
दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव झाल्याने बाबर आझमच्या संघाची स्थिती बिकट झाली. भारताप्रमाणेच पाकिस्तानसाठीही उपांत्य फेरीची चावी आता त्यांच्याच हातात आहे. मात्र, आता उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.
पाकिस्तानला आता दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत करावे लागेल आणि आता भारताने आपले दोन्ही सामने गमावावेत अशी प्रार्थनाही करावी लागेल. दुसरीकडे नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवले तरी पाकिस्तानला फायदा होऊ शकतो.
पाकिस्तानला नेट रन रेटचीही काळजी घ्यावी लागेल आणि नेट रन रेटच्या बाबतीत भारताला मागे टाकावे लागेल. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द व्हावा अशी प्रार्थनाही त्यांना करावी लागेल, तरच पाकिस्तान या स्पर्धेत टिकून राहिल.
महत्वाच्या बातम्या
Rishabh Pant : …म्हणून रिषभ पंतला अंतिम ११ मध्ये घेत नाहीत; संघाच्या आतल्या गोटातूनच झाला मोठा खुलासा
Ravichandran Ashwin : अचानकच निवृतीच्या गोष्टी करायला लागला अश्विन; म्हणाला, ‘सर्वांचे खूप खूप आभार, माझी क्रिकेट कारकिर्द…
KL Rahul : “याला भारताच्या सर्व फॉरमॅटमधील संघातून बाहेर काढा”; केएल राहुलवर चाहते भडकले
Marriage: …त्यामुळं जोडप्यानं हॉस्पिटलमध्येच घेतले सात फेरे, कारण वाचून तुम्हीही व्हाल अवाक