या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या पूलावर छटपूजेच्या निमित्ताने 500 ते 600 भाविक उपस्थित होते. अचानक पूल कोसळल्यामुळे अनेक महिला व लहान मुलेदेखील नदीत कोसळले. मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 141 च्याही पुढे गेला असल्याच बोललं जातं आहे.
तर 200 पेक्षा जास्त जण या घटनेत जखमी झाले आहेत. तर 200 जण अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता ही दुर्घटना घडली. पाचच दिवसांपूर्वी नूतनीकरण झालेल्या पूलाचे केबल तुटल्याने ही घटना घडली. विशेष बाब म्हणजे ब्रिटिशांच्या काळातील हा ब्रीज आहे.
या दुर्घटनेबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ‘रविवारी सुट्टी असल्याने पुलावर गर्दी होती. फोटो काढण्यासाठी सर्वांचीच लगबग सुरू होती. फोटो काढण्यासाठी पुलाच्या मध्यभागी जाण्याचा प्रयत्न करत होते. पुलाच्या मधोमध मोठी गर्दी झाल्याने पूल त्या ठिकाणाहून तुटला.
धक्कादायक बाब म्हणजे आता अशीही माहिती समोर येत आहे की, काही तरुण पुलावर पाय मारत होते. काही तरुणांनी स्विंग ब्रिज तोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे ही दुर्घटना घडली असल्याच देखील बोलल जातं आहे. या अपघातामध्ये महिला आणि लहान मुले सर्वाधिक आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. मात्र मोरबी पूल दुर्घटनेमुळे पंतप्रधान मोदी यांचा गुजरातमधील रोड शो रद्द करण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत पंतप्रधानांच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर