akshay kumar : सूर्यवंशीच्या सेटवर अक्षय आणि रोहितमध्ये झाली होती हाणामारी, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

akshay kumar rohit shetty fight video  | अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट ‘सूर्यवंशी’ गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. तर ‘सूर्यवंशी’चे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते.

या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळाली. या चित्रपटात अनेक फाईट सीन्स होते. पण तुम्हाला माहितीये का की ऑनस्क्रीनसोबतच ऑफस्क्रीनसुद्धा फाईट झाली होती. चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यात सेटवर बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुद्धा झाली होती.

अक्षय कुमारने शेअर केलेला एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला, अक्षयची सह-कलाकार कतरिना कैफ तिच्या फोनवरून एक बातमी वाचताना दिसते.

त्यानंतर रोहित शेट्टी समोरुन येतो. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची होती. त्यानंतर दोघेही एकमेकांना मारहाण करताना दिसतात. पण ती फक्त एक मस्करी असते. दोघेही मस्करीत एकमेकांना मारताना दिसतात. पण त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अक्षय कुमारने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये त्याने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. तो म्हणाला की, एक असा संघर्ष जो कदाचित तुमचा दिवस बनवेल.हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आणि त्यावर जोरदार कमेंटही केल्या जात आहे.

दरम्यान, ‘सूर्यवंशी’ची निर्मिती रोहित शेट्टीसोबत करण जोहरने केली होती. या चित्रपटात ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’ चित्रपटाचे हिरोही दिसून आले होते. ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’ या दोन्ही चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केले होते. सूर्यवंशीमध्ये रणवीर सिंग, अजय देवगण आणि अक्षय कुमार हे तिघेही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते.c

महत्वाच्या बातम्या-
Aditya Thackeray : ‘आपले मुख्यमंत्री दहीहंडी, गणपती मंडळ अन् फोडाफोडी सोडून दुसरं काहीच करत नाहीत’
ajit pawar : टाटा-एअरबसवरून अजितदादा भडकले; राज्य सरकारचं भांडं फोडत केली शिंदे – फडणवीसांची बोलती बंद
Chandrakant Patil : अजित पवार अन् मुख्यमंत्री…; चंद्रकांत पाटलांनी उडवली रोहित पवारांची खिल्ली