shivsena : ठाकरे गटाचं टेंशन वाढलं, अंधेरी पोटनिवडणुक रद्द होण्याची शक्यता? जाणून घ्या काय आहे प्रकरण

shivsena : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळी चांगलेच कामाला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. सध्या चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे, अंधेरी पोटनिवडणूक..! भाजपने जरी या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी देखील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या पुढील अडचणी कमी झालेल्या नाहीये.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना – भाजप पुन्हा आमनेसामने आले. मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, भाजपने या निवडणुकीतून माघार घेत ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे.

मात्र असं असलं तरी देखील, ऋतुजा लटके यांच्या समोर आता नवीन आव्हान उभे राहिले आहे. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीव आक्षेप घेण्यात आल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर ठाकरे गटात देखील यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  एका अपक्ष उमेदवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित तक्रार केली आहे. या पत्रात उमेदवारी मागे घेण्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला  आहे.

एवढंच नाही तर, सात दिवसांच्या आत उत्तर न आल्यास आपण न्यायालयात जाणार आहोत असा इशाराही मिलिंद कांबळे यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा  ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर अद्याप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर