Chandrakant Patil on ajit pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री झालेले सर्वांनाच पाहायला आवडेल, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. बारामतीच्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी असे वक्तव्य केले होते.
आता रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी रोहित पवार यांची खिल्ली देखील उडवली आहे. अजित पवार अन् मुख्यमंत्री… २०२४ पर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र राहणार का? तुमच्या पक्षातील लोकं तरी एकत्र राहणार का? असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
२०२४ पर्यंत ते एकत्र तरी राहतील का? त्यांच्या पक्षातील लोकं तरी एकत्र राहणार आहे का? मुख्यमंत्री असंच बनत नाही. त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. चंद्रकांत पाटलांची ही प्रतिक्रिया सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला आहे. महात्मा गांधींसारखे नेते देशात निर्माण झाले कारण ते देशात फिरले. सामन्यांना भेटले बोलले. हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना उशिरा कळलं. मातोश्रीमध्ये राहून लोकांची दु:ख कळतात असे त्यांना वाटत होते. पण आता त्यांना बाहेर येऊन सामन्यांना भेटणं गरजेचं आहे, हे कळलं, ही चांगली गोष्ट आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटीवर जातो तेव्हा काही मागण्याची करायच्या असतात. पण आपण सत्तेत असताना त्या गोष्टी केल्या की नाही, याची आठवणही ठेवायला पाहिजे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे विरोधक सत्ताधारांवर चांगलेच आक्रमक झाले. तसेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आता राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला हिरोईनसोबत रोमान्स करताना रंगेहात पकडले, त्याने बायकोवर गाडी घालून चिरडले
Elon Musk : …म्हणून एलोन मस्कने पराग अग्रवालची ट्विटरमधून हकालपट्टी केली; खरे कारण आले समोर
धाडसाला सलाम..! अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी ग्रहणाशी डोळे भिडवले आणि…, वाचून वाटेल अभिमान