Share

दिवाळीची सुट्टी अन् पगार देत नव्हता मालक, संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मालकालासोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य

diwali

two worker kill their owner | छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून मंगळवारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायपूरमधील मॅगी पॉइंट रेस्टॉरंट ऑपरेटरची हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, हत्या तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केली आहे. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी पकडले आहे.

पोलिसांनी सांगितले की, ४५ वर्षीय अजय गोस्वामी महाराजा मॅगी पॉइंट नावाने रेस्टॉरंट चालवत होते. मध्य प्रदेशचा रहिवासी सागर सिंग सैयाम आणि ओडिशाचा रहिवासी चिन्मय साहू येथे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून अजय गोस्वामी यांचा या दोन कर्मचाऱ्यांसोबत पैशांवरून वाद सुरू होता.

पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता ते म्हणाले, अजय गोस्वामी हे गेल्या अनेक महिन्यांपासून पगार देत नव्हते. पगाराच्या मुद्द्यावरून वारंवार भांडणे होत होती. दिवाळीच्या मुहूर्तावरही पैसे किंवा सुट्टी दिली जात नव्हती. दुसऱ्या दिवशी अजयने काम करायला सांगितले, तेव्हा दोन्ही कर्मचाऱ्यांनी सांगितले की आज सुट्टी आहे, आज काम करणार नाही.

आरोपी पुढे म्हणाला, हे ऐकताच अजयने दोघांनाही काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्हाला मारहाण होत होती, त्यामुळे आम्ही सुद्धा लोखंडी रॉडने अजय यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही त्यांना मारहाण केली तेव्हा ते जिवंत होते. ते बेशुद्ध झाले होते.

मारल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. रेल्वे स्टेशन, भाटा गाव बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संधी पाहून दोन्ही आरोपींना आपापल्या गावी पळून जायचे होते. मात्र, पोलिसांनी दोन्ही आरोपींना भाटा गावच्या बसस्थानकाजवळून अटक केली.

पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा कारागृहात पाठवण्याची तयारी केली आहे. स्टेशन प्रभारी वेदवती दारिओ यांनी सांगितले की, पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी अजय गोस्वामी त्यांच्या दुकानात बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

महत्वाच्या बातम्या-
shivsena : राजकारण तापलं..! “….तर मी घरात घुसून मारेन,” अमेय खोपकरांचा शिवसेना नेत्यांना इशारा
bachhu kadu : १२ आमदार घेऊन बाहेर पडू म्हणणाऱ्या बच्चू कडूंबाबत केसरकरांनी स्पष्टच सांगितलं, ‘त्यांच्याबरोबर २ आमदार…’
arvind kejriwal : नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा; केजरीवालांच्या मागणीने उडाली खळबळ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now