virat kohli 3 runs icc explained | रविवारी टी २० वर्ल्डकप २०२२ मधला भारताचा पहिला सामना झाला. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. हा सामना खुपच थरारक होता. सामना कोण जिंकेल हे शेवटपर्यंत सांगता येत नव्हते. पण विराटच्या ८२ धावांच्या खेळीमुळे भारताला हा सामना जिंकला आहे.
अक्षर पटेल धावबाद, नो बॉल आणि फ्री हीटचा चेंडू स्टंपला लागल्यानंतर विराटने काढलेल्या ३ धावा या सर्व गोष्टींमुळे हा सामना चांगलाच चर्चेत आला होता. १६० धावांचे लक्ष्य पुर्ण करताना ४ फलंदाज भारताचा स्कोर ३१ धावा असताना तंबुत परतले होते. पण त्यानंतर विराट आणि हार्दिक पांड्याने ११३ धावांची मोठी भागीदारी केली.
विराट आणि पांड्या चांगले लयीत असताना शेवटच्या षटकात मात्र मॅच पलटली. त्या षटकात भारतीय संघाने पांड्याची विकेट गमावली. भारताला शेवटच्या षटकात १६ धावा लागत होत्या. मोहम्मद नवाबजच्या पहिल्या चेंडूवर पांड्याने मोठा शॉट मारला पण बाबर आझमने त्याचा झेल घेतला.
त्यानंतर जेव्हा तीन चेंडूंत १३ धावा लागत होत्या तेव्हा विराटने एक षटकार मारला. तसेच तो हाईटमुळे नॉ बॉल ठरवण्यात आला. त्यामुळे ३ चेंडूत ६ धावा लागत होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. त्यानंतर पुढचा चेंडू त्याने स्टंपवर टाकला आणि तो स्टंपला आदळला. त्यावेळी विराटने आणि कार्तिकने पळून तीन धावा काढल्या. त्यावेळी पाकिस्तानचे खेळाडू खुप नाराज झाले होते आणि ते डेड बॉलची मागणी करत होते.
https://twitter.com/ICC/status/1584170266334199809?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584170266334199809%7Ctwgr%5E8126341cbc9a1b203f08b1704a1b552660f02dc2%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcricket%2Fnews%2Find-vs-pak-t20worldcup-icc-explained-dead-ball-controversy-why-india-were-given-3-byes-after-virat-kohli-was-bowled-off-free-hit-a593%2F
अशात MCC च्या नियामानुसार बघितलं तर विराट पुर्णपणे बरोबर आहे. कारण जेव्हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून सुटतो आणि सीमारेषेवर जातो तेव्हा बॉल डेड झाला असे म्हटले जाते. फ्री हिट असताना चार प्रकारेच फलंदाज बाद होऊ शकतो. हाताने चेंडू रोखल्याने, बॅटने चेंडूला दोनदा मारल्याने, क्षेत्ररक्षणास अडथळा केल्याने आणि धावबाद झाल्याने. त्यामुळे स्टंपला चेंडू लागल्यानंतर विराटने ३ धावा काढल्या.
त्या स्टंप आऊटनंतरही थरार कायम होता. कारण दिनेश कार्तिक बाद झाला होता. १ चेंडूमध्ये २ धावा लागत होत्या, तेव्हा अश्विन स्ट्राईकवर आला. त्यावेळी नवाजने वाईड टाकला. त्यामुळे १ चेंडूत १ धाव लागत होती. त्यावेळी अश्विनने चौकार मारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. आयसीसीने शेवटच्या षटकावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी नियम सांगत पाकिस्तानच्या खेळाडूंची बोलती बंद केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
udhav thackeray : राजकारणात पुन्हा भूकंप? शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, राजकीय समीकरण बदलणार
१०० रूपयांना सांगीतलेला आनंदाचा शिधा २०० रूपयांना पडणार, तेल गायब; सामान्यांची दिवाळी संकटात
Virat Kohli : विराट कोहलीच्या धडाकेबाज कामगिरीत पांड्याचाही होता वाटा? सामन्यानंतर विराट म्हणाला…






