Virat Kohli : सामन्यानंतर खुपच भावूक झाला विराट कोहली, राहूल द्रविडलाही मारली घट्ट मिठी; पहा भावूक करणारा व्हिडिओ

virat kohli emotional after seeing rahul dravid  | रविवारी टी २० वर्ल्डकप २०२२ च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. सामन्यात कधी पाकिस्तान तर कधी भारत जिंकेल असे वाटत होते. पण विराटच्या दमदार खेळीमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला गुडघे टेकावे लागले आणि भारतीय संघाने हा सामना जिंकला.

मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध जो ऐतिहासिक विजय मिळवला होता तो दीर्घकाळ स्मरणात राहील. विराट कोहलीने एकट्याने ८२ धावा करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली. तो या सामन्याचा हिरो होता आणि त्याने या सामन्यात पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे.

या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ विकेट्सने पराभव केला. प्रथम खेळताना पाकिस्तानने ८ विकेट्स गमावून १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ६ विकेट्स गमावून मोबदल्यात १६० धावा करून विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सुरुवातीला हतबल होताना दिसत होता.

भारतीय संघाच्या फलंदाजीच्या सुरुवातीला रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. सूर्यकुमार यादवही काही चांगले शॉट्स खेळून बाद झाला. भारतीय संघाच्या चार विकेट लवकर पडल्या. यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने डावाची धुरा सांभाळत जबरदस्त कामगिरी केली.

विराट कोहलीने अवघ्या ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या आणि शेवटपर्यंत क्रीजवर राहून संघाला विजयाकडे नेले. चाहत्यांना जुन्या विराट कोहलीची झलक पाहायला मिळाली आणि त्यामुळेच सध्या फक्त त्याच्याबद्दलच बोलले जात आहे. त्याचवेळी, सामन्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विराट कोहली मैदान सोडताना दिसला.

या व्हिडिओमध्ये तो मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. राहूल द्रविडची भेट घेतली तेव्हा विराटने लहान मुलाप्रमाणे द्रविडला घट्ट मिठी मारली होती. तसेच भावूक सुद्धा झाला होता. याशिवाय माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही विराट कोहलीची भेट घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
love story : डायलिसिसच्या त्रासामुळे खुप वैतागला होता पती, पत्नीने स्वत:ची किडनी देत त्रासातून केली सुटका
भारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल
shivsena : राजकीय भूकंप! शरद पवारांचा विश्वासू पक्षाला सोडचिठ्ठी देणार, वाचा नेमकं काय घडलंय?