shivsena : शिवसेनेत सध्या भूकंप होतं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट शिवसेनेत निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसला आहे.
अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी – कॉंग्रेसला देखील गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीमधील बडे – बडे नेते शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. यामुळे सध्या राष्ट्रवादीच्या गोटात देखील खळबळ उडाली आहे.
ही सांगण्याच कारण म्हणजे, आता शरद पवारांचे विश्वासू देखील शिंदे गटात सामील होतं असल्याच वृत्त समोर आलं आहे. यामुळे याचे धक्के थेट शरद पवारांना बसले असल्याच बोललं जातं आहे. ‘राष्ट्रवादी’चे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे लवकरच पक्षाला रामराम ठोकणार असल्याच बोललं जातं आहे.
शनिवारी कोल्हे यांनी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांची भेट घेतली आहे. तसेच याबाबत बोलताना कोल्हे यांनी सांगितलं आहे की, दिवाळीनंतर शिंदे गटात प्रवेश करणार आहे. काही दिवसांपासून कोल्हे हे शिंदे गटात जाणार असल्याच राजकीय वर्तुळात बोललं जातं होतं.
दरम्यान, अलीकडच्या काही काळात कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाशी संपर्क वाढवला आहे, विशेष बाब म्हणजे त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. असं असतानाच पुन्हा कोल्हे यांनी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपला शिंदे गटातील प्रवेश अखेर फिक्स केला आहे.
दिवाळीनंतर कोल्हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यावर अद्याप राष्ट्रवादी – कॉंग्रेसमधील बड्या नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र असं असलं तरी देखील कोल्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश राष्ट्रवादीसाठी धोका असल्याच बोललं जातं आहे. कोल्हे यांच्या रूपाने सोलापूरात मुख्यमंत्री शिंदेंचे वजन वाढणार असल्याच आता बोललं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल