shinde group : दिवाळी सण सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा होतं असतानाच शेतकऱ्यांना मात्र परतीच्या पावसाने मोठा फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजाला अश्रु अनावर झाले आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेते देखील बळीराजाला धीर देण्यासाठी बांधावर जाऊन पाहणी करत आहे.
अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट औरंगाबादमध्ये जाऊन पाहणी दौरा केला आहे. परिस्थिती पाहून तात्काळ उद्धव ठाकरेंनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अशातच शिंदे गटातून एक वेगळी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरेंप्रमाणेच शिंदे गटातील अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे. स्वत: परिस्थिती पाहिली आहे. तर आता आम्ही तुम्हाला अशी एक बाब सांगणार आहोत, की तुम्ही देखील विचार करतं बसाल.
हाती आलेल्या महितीनुसार, शिंदे गटाच्या आमदाराने शेतकऱ्यांच्या या दु:खात सहभागी होण्यासाठी आपणही दिवाळी न साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी करणार असल्याची घोषणा आमदार शिंदे गायकवाड यांनी केली आहे.
एवढंच नाही तर ही कृती जिल्हाधकारी कार्यालयासमोर करुन एक संदेश देणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितलं आहे की, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत असल्याच त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बळीराजाच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. याच कारणामुळे आपण ही दिवाळी साजरी करणार नसल्याच गायकवाड यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की, ‘हे सरकारविरोधात आंदोलन नाही.’
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल