sharad pawar : राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. शरद पवार कधी काय गुगली टाकलीत? याचा काही नेम नाही. राज्याच्या राजकारणात अनेकदा शरद पवारांनी असे काही डाव टाकले आहेत की, बड्या – बड्या नेत्यांना घाम फुटला आहे.
एकीकडे राजकीय वातावरण तापलं आहे तर दुसरीकडे अलीकडे नुकतीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणुक पार पडली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारांसोबत विरोधक एकाच व्यासपीठावर दिसले. खास बाब म्हणजे, या निवडणुकीच्यानिमित्ताने शरद पवार आणि भाजपाचे नेते आशीष शेलार यांच्या गटाची युती दिसून आली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता याचाच धागा पकडत एक वक्तव्य केलं आहे. आठवले यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून आठवले यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष्य वेधून घेतलं आहे. माध्यमांशी बोलताना आठवले यांनी याबाबत व्यक्तव्य केलं आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीबद्दल बोलताना आठवले यांनी म्हंटलं आहे की, “शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही. आताची त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बाद करणारी आहे, असं सूचक वक्तव्य आठवले यांनी केलं आहे.
२०२४ च्या निवडणुकीमध्ये पवार मोदींना साथ देतील असं आठवले म्हणाले आहेत. आठवले यांच्या वक्तव्याने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढे बोलताना आठवले यांनी म्हंटलं आहे की, “शरद पवार हे कधी गुगली टाकतील सांगता येत नाही. त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बोल्ड करणारी आहे,” असंही आठवले म्हणाले आहे. सध्या आठवले यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…