Share

Jami masjid : जामी मशिदीला भीषण आग; काही क्षणांमध्ये मशीद झाली जमीनदोस्त, पाहा थरारक व्हिडीओ

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील मोठ्या मशिदीला भीषण आग लागली आहे. मशिदीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना ही आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे. या भीषण आगीमुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.

या भीषण आगीमुळे आता मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. जकार्ता इस्लामिक सेंटरच्या परिसरातील ही मशीद आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गल्फ टुडेच्या वृत्तानुसार, मशिदीच्या नूतनीकरणादरम्यान आग लागल्याने घुमट कोसळला. स्थानिक वेळेनुसार काल दुपारी ३ वाजता आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली, किमान दहा अग्निशमन दल पाठवण्यात आले. मात्र, आग विझवता आली नाही, असे इंडोनेशियातील माध्यमांनी सांगितले आहे.

तसेच वृत्तानुसार, मशिदीच्या घुमटाला आग लागली तेव्हा आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. मात्र, आग वाऱ्यामुळे मोठी झाली. आग लागली तेव्हा सुरुवातीला परिसरातील लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर घुमट पडला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये मशीद कोसळण्यापूर्वीच्या घुमटातून ज्वाळा आणि धूर निघताना दिसत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यावेळी इस्लामिक सेंटरमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते, असे स्थानिक मीडियाने सांगितले आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आगीच्या कारणाचा तपास करत असून, इमारतीत काम करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी सुरू आहे. इस्लामिक सेंटर कॉम्प्लेक्समध्ये मशिदीव्यतिरिक्त शैक्षणिक, व्यावसायिक आणि संशोधन सुविधाही आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now