Share

Eknath Shinde : त्यावेळी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले अन् म्हणाले की…; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा

aaditya thakre and eknath shinde

aditya thackeray talk about eknath shinde  | काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले होते. तसेच त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत नवीन सरकार स्थापन केले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले होते. त्यामुळे शिवसेनेसोबतचं हे आतापर्यंतच सर्वात मोठ बंड होतं.

या बंडामुळे तापलेले राजकारण अजूनही शांत झालेलं नाही. अशात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. तसेच या बंडाबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्याला त्यांनी उत्तर दिले आहे.

राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे अशी अनेक बंड शिवसेनेने आधी बघितली आहे. पण एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे खुप मोठं होतं. शिवसेनेचे ४० आमदार त्यांच्यासोबत गेले होते. विशेष म्हणजे हे बंड उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं. त्यामुळे या बंडाची पुर्वकल्पना आली नव्हती का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता.

प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एक दिड वर्षांपूर्वीच आम्हाला याची कुणकुण लागली होती. उद्धवजींनी त्यांना मातोश्रीवर बोलवलं होतं. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? तुमची तशी इच्छा असेल तर सांगा. मी बाजूला होतो, तुम्ही जबाबदारी स्वीकारा. त्यावेळी शिंदे ढसाढसा रडले होते आणि म्हणाले होते की आपली अशी कोणतीच इच्छ नाहीये.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत गेलो तर आम्हाला सतत सांगितलं जायचं की, त्या दोन्ही पक्षांकडे लक्ष ठेवा. ते कधीही पाठीत खंजीर खुपसू शकतात.पण प्रत्यक्षात आमच्याच माणसाने पाठीत खंजीर खुपसला. आम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला हीच आमची चूक होती.

आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद हवे आहे का? असे विचारले होते. त्यावेळी त्यांनी मातोश्रीवर अश्रू ढाळले होते. पक्षासोबत कधीच असं करणार नाही, असे ते म्हणाले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. ही आमची चूक होती. हे मान्य करतो, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच गद्दारी केलेल्या आणखी एका माणसाने पोह्यांवर हात ठेऊन शप्पथ घेतली होती. पण त्यांनीही गद्दारी केली. झालं ते चांगलंच झालं. कारण अशी माणसं पक्षात नकोच. या ४० जागांवर नव्यांना संधी मिळेल. नव्यांमुळे अनेक चांगल्या शिवसैनिकांना मातोश्रीपर्यंत पोहचता येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

गद्दारी केलेल्या आमदारांची अवस्था काय होईल ते लवकरच कळेल. कारण त्यांनी ५० खोके घेऊन गद्दारी केली आहे.पुढच्या निवडणूकीत त्या ४० जणांना तिकीट मिळणार नाही. त्यांना त्यांचे मतदार संघ सोडावे लागतील. उद्धव ठाकरे भेटत नाही, अशी त्यांची तक्रार होती. पण ते कोणावर तरी खापर फोडायचे म्हणून फोडायचे म्हणून ते असे बोलत आहे. वर्षाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं तर लगेच त्यांचा खोटेपणा लक्षात येईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहे.

तब्बल ४० आमदार शिंदेसोबत गेले होते. काही तर एकनिष्ठ आहोत असे सांगत होते. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न तुम्ही का केला नाही? या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी दिले आहे. ते म्हणाले की, माणूस एकदा विकला गेला की अशा गोष्टींनी काही फरक पडत नसतो. त्यावेळी मी उद्धवजींशी बोललो होतो. ते म्हणाले होते की, त्यांना थांबवण्यात काहीच अर्थ नाही.त्यांना जाऊदे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
bachchu kadu : शिंदे-भाजप सरकारमध्ये पडली मोठी फुट? दोन्ही मित्रपक्षांचे एकमेकांवर गंभीर आरोप, म्हणाले फक्त पैशासाठी…
Vijay kedia : १९ व्या वर्षी मार्केटमध्ये उतरुन झाले ७९२ कोटींचे मालक, वाचा केडियांच्या गुंतवणूकीच्या ‘या’ भन्नाट पाच टीप्स
Sanjay Rathod : संजय राठोंडांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन, ‘या’ माजी मंत्र्याला उतरवणार निवडणूकीच्या रिंगणात

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now