deepika angry on prasad vedpathak trollers | सोशल मीडियावर दीपिका आणि प्रसाद वेदपाठक हे खुप सक्रीय असतात. अनेकदा त्यांच्या रिल्स व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर ते प्रसिका नावाने ओळखले जातात. पण गेल्या काही दिवसांमुळे ते दोघेही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.
प्रसादला सोशल मीडियावर खुप ट्रोल होत आहे. त्यामुळे संतापलेल्या दीपिकाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. प्रसिकाने ट्विट करत आपल्या मनातील संताप व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनी आपल्या पतीचा अपमान केला आहे, असा तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.
ट्विट करत तिने म्हटले आहे की, अनेकांनी माझ्या पतीला बदनाम आणि अपमानित केले आहे. त्याचे कारण म्हणजे त्याने मला पैसे कमवण्यासाठी सांगितलं म्हणून. ज्यांनी आम्हाला ट्रोल केले आहे, त्यांना मला सांगायचे आहे की, आम्ही बिझनेट पार्टनर आहोत.
पुढे तिने म्हटले की, तसेच बिझनेस पार्टनरसोबत आम्ही शाळेतील मित्रही आहोत. आम्ही दोघांनी मिळून आमचं विश्व तयार केलं आहे. त्यामुळे आमच्यावर जळू नका. वाटलं आमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करा. सध्या त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
https://twitter.com/prasika4u/status/1582306624404082689
या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. प्रसिका हे ट्विटर अकाऊंट प्रसाद आणि दीपिका या दोघांचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनोखा कंटेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच त्यांचे रिल्स अनेकदा व्हायरल होत असतात.
२०१४ साली त्यांनी पहिल्यांदा युट्युबवर सुरुवात केली होती. ते युअर इंडियन कन्झ्युमर नावाच्या चॅनेलमध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामवर प्रसिका नावाने इंस्टाग्रामवर अकाऊंट उघडले आहे. त्यावर ते रिल्स शेअर करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात.
महत्वाच्या बातम्या-
Aryan khan : NCB च्या ७/८ अधिकाऱ्यांनी आर्यन खानला मुद्दामहून अडकवले; NCB च्याच स्पेशल टिमने केली पोलखोल
Bachchu Kadu : गुवाहटीला जाण्यासाठी बच्चू कडूंनी पैसे घेतले; फडणवीसांच्या जवळच्या मित्राचा खळबळजनक आरोप
वर्ल्ड कप विनर, डॉग लवर, मुलाच्या सिलेक्शनवरून वाद; वाचा BCCI चे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्याबद्दल..