bjp leader sanjay deshmukh in uddhav thackeray | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. पण त्यातून ते एक नवी उभारी घेताना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे हे बंडखोरी आमदारांविरोधात पर्याय शोधताना दिसून येत आहे. अशात काही मोठे नेतेही शिवसेनेत परतताना दिसत आहे.
माजी राज्यमंत्री संजय देशमुख हे गुरुवारी शिवसेनेत येणार आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहे. देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे दारव्हा-दिग्रस मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरु होती. पण गुरुवारी ते शिवबंधन बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत मागील महिन्यात अकोला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी संजय देशमुख यांची भेट घेतली होती. तसेच शिवसेनेबाबत चर्चा केली होती. त्या दिवसापासून संजय देशमुख कधीही शिवसेनेची मशाल हाती घेऊ शकतात असे म्हटले जात होते.
दिग्रस मतदार संघामध्ये संजय देशमुख यांना शिंदे गटाकडून आव्हान मिळणार आहे. त्या मतदार संघात संजय राठोड आणि संजय देशमुख यांच्यात लढत पाहायला मिळेल. संजय देशमुख यांनी १९९९ ते २००९ या काळात दिग्रस मतदार संघाचे नेतृत्व केले आहे.१९९९ मध्ये शिवसेनेने त्यांची विधानसभेची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ते अपक्ष लढले होते. त्यावेळी त्यांनी १२५ मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव केला होता.
विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते क्रीडा खात्याचे मंत्री होते. २००४ मध्येही ते अपक्ष म्हणूनच विधानसभेवर निवडून आले. पण २००९ च्या विधानसभा निवडणूकीत देशमुख यांना संजय राठोडांनी पराभूत केले आहे. तर २०१९ लोकसभा निवडणूकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
तसेच विधानसभेला सेना भाजप युतीमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना ७५ हजार मते मिळाली. मतदार संघातील विविध संस्थांवर संजय देशमुख यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मतांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
Shinde group : शिंदे गटाने करार मोडला; वरिष्ठ नेत्यांना फाट्यावर मारत भाजपचा ‘हा’ मुंबईतील मंत्रीच फोडला
तोंडावर पडताच शहाजी बापू पाटलांनी मारली पलटी, फिरवा-फिरवी करत म्हणाले…
Uddhav Thackeray : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाची कमाल! गावाला २० वर्षांनंतर मिळाला सरपंच