Share

Sanjay shirsat : शिंदेगटातील आमदार संजय शिरसाटांची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी एअर ॲम्बुलसने मुंबईला हलवले

शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान त्यांना उपचारांसाठी आता औरंगाबादहून मुंबईला आणण्यात येत आहे. एअर अ‍ॅब्युलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला आणण्यात आल्याची माहिती आहे.

संजय शिरसाट यांना काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज सकाळी तातडीने उपचारांसाठी मुंबईला आणण्यात आले आहे. दरम्यान,औरंगाबाद विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

सोमवारी दुपारपासूनच संजय शिरसाट यांना त्रास होत होता. यामुळे त्यांना दुपारी सिग्मा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. येथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र त्यांना पुढील २४ तासांमध्ये मुंबईला नेण्यात यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला. यानंतर त्यांना मुंबईतील हॉस्पिटलध्ये तातडीने हलवण्यात आले.

दरम्यान त्यांची प्रकृती ही सध्या स्थिर असल्याची माहिती सिग्मा हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून मिळाली आहे. आता मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील अशी माहिती देखील समोर आली आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची भीतीही अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या ४० हून अधिक बंडखोर आमदारांमध्ये संजय शिरसाटही होते. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत मिळत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरु झाली.

संजय शिरसाट यांनीही ही नाराजी अनेक वेळा बोलून दाखवली, या नाराजीमुळे ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात सामील होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now