लिव्ह इन रिलेशनशिपला अजूनही देशात निषिद्ध मानले जाते. आपल्या आजूबाजूला किंवा समाजात लग्नाशिवाय राहणाऱ्या जोडप्यांना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. अशा जोडप्यांना घर भाड्याने देण्यासही लोक कचरतात. मात्र, मेट्रो शहरांमध्ये त्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. पण आजही छोट्या शहरांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप स्वीकार्य नाही. दरम्यान, राजस्थानमध्ये एक हजार वर्षांपूर्वीची लिव्ह-इन रिलेशनशिप परंपरा आहे. Live in Relationship, Tradition, Marriage, Rajasthan
मूळचे राजस्थानच्या दक्षिण भागात राहणाऱ्या ‘गरासिया’ जमातीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यामुळे ही जमात काळाच्या पुढे धावत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे इथे मुली स्वतःच आपला जोडीदार निवडतात आणि त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात.
महत्वाच म्हणजे या जमातीत मुलेही लग्नाशिवायच जन्माला येतात आणि कधी कधी खूप वर्षानंतर विवाह होतात. गरासिया जमातीत अशी काही कुटुंबे आहेत ज्यात अनेक पिढ्यांपासून त्यांचे लग्न झालेले नाही. ते त्यांच्या आवडीचा जीवनसाथी निवडतात आणि पती-पत्नी म्हणून जगतात. गरासिया जमात राजस्थानमध्ये तसेच गुजरातच्या काही भागात राहतात.
राजस्थानमधील पाली, उदयपूर आणि सिरोही जिल्ह्यांतील गावे स्थायिक आहेत. या समाजाचे लोक मूळचे कोत्रा, सिरोहीच्या अबू रोड तहसील, पाली जिल्ह्यातील बाली आणि देसुरी तहसील, उदयपूरच्या गोगुंडा आणि खेरवारा या तालुक्यात शतकानुशतके वास्तव्य करत आहेत.
गरासिया जमातीतर्फे दरवर्षी ‘गौर मेळा’ आयोजित केला जातो. हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. जिथे या जमातीच्या मुली आपला जोडीदार निवडतात. त्यानंतर मुलाच्या कुटुंबाला मुलीच्या कुटुंबाला रक्कम द्यावी लागते. गरासिया समाजात महिलांचे स्थान पुरुषांपेक्षा वरचे मानले जाते.
अनेक शतकांपूर्वी गरासिया समाजातील चार भाऊ दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाल्याची एक प्रचलित कथा आहे. त्यात चार पैकी तीन भावांची लग्ने झाली. तर एक भाऊ लग्नाशिवाय लिव्ह इनमध्ये राहू लागला. मात्र लग्नानंतर तिन्ही भावांना मूलबाळ झाले नाही. तर चौथ्या भावाच्या मुलाने आपल्या कुटुंबाचा वंश पुढे नेला, त्यानंतर गरासिया समाजाने लग्नाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परंपरा सुरू केली.
महत्वाच्या बातम्या-
Karva Chauth: OMG! करवा चौथच्या दिवशी पतीने पत्नीला दिली खास भेट, थेट प्रियकरासोबत लावून दिले लग्न
Marriege Essay : लहान मुलाने लग्नावर लिहिला भन्नाट निबंध, पाहून शिक्षीकेलाही फुटला घाम; म्हणाली, ‘तु मला येऊन भेट’
crime news : लग्नाच्या पहिल्या रात्री, नवरीने जे काही केलं ते वाचून तुम्हीही हादरल, नवरा अजूनही शॉकमध्ये!






