Jyotiraditya Shinde : ज्योतिरादित्य शिंदे यांचा ‘जय विलास पॅलेस’ जगभरात प्रसिद्ध आहे. मोठा भव्यदिव्य जय विलास पॅलेस कायमच मध्यप्रदेशमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचे दिसते. याठिकाणी आजही शिंदे परिवारातील सदस्य राहत असून या भागात पर्यटकांना परवानगी नाही. जय विलास पॅलेसमधील मोठ्या झुंबराबाबत, डायनिंग हॉलमधील चांदीच्या ट्रेनबद्दल अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. याच जय विलास पॅलेसमध्ये आज भाजपचे नेते, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना ज्योतिरादित्य शिंदे यांनी जेवणाचे आमंत्रण दिले आहे.
यानिमित्ताने आपण जय विलास पॅलेसबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. जय विलास पॅलेसमध्ये तब्बल ४०० खोल्या आहेत. ३५ खोल्यांमध्ये शिंदे राजपरिवाराचे संग्रहालय आहे. त्या ३५ खुल्या काही वर्षांपूर्वी नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. इतर खोल्यांमध्ये आजही शिंदे परिवारातील सदस्य राहतात.
शिंदे घराण्याने हा जय विलास पॅलेस बांधला आहे. १८७४ ला जयाजीराव शिंदे हे ग्वालियरचे राजा असताना या महालाचे बांधकाम झाले. वास्तुविशारद मायकल फिरोल याने हा महाल बांधला. त्यामध्ये कोरीथीयान, इटालियन शैलीसोबत टक्सन शैलीचा वापर केला आहे. त्याकाळी १ कोटी एवढा खर्च हा महाल बांधण्यासाठी शिंदे घराण्याला आला. आता याच महालाची किंमत तब्बल ४ हजार कोटी रुपये आहे.
या महालाची खासियत म्हणजे, जगातील सर्वात मोठे झुंबर या महालामध्ये लावण्यात आले आहे. हे झुंबर ३५०० हजार किलोंचे आहे. तसेच १४० वर्षांपासून हे झुंबर छताला टांगलेले आहे. तज्ज्ञांच्या मते, झुंबर लावण्याआधी छत किती मजबूत आहे? हे बघण्यासाठी छतावर हत्तीला चढवण्यात आले होते. त्यानंतरच हे झुंबर लावण्यात आले. बेल्जियमच्या कारागिरांकडून हे झुंबर बनवून घेण्यात आले होते.
या महालाची अजून एक खासियत म्हणजे, जेवणाच्या पंगती ज्या डायनिंग हॉलमधून उठतात. त्या ठिकाणी डायनिंग टेबलवर चांदीची ट्रेन आहे. खास पाहुण्यांना या ट्रेनमधून जेवण वाढले जाते. ट्रेन जाण्यासाठी त्या ठिकाणी रूळ देखील करण्यात आले आहेत. तसेच आजही या महालाच्या सिलिंगला जडलेलं सोनं आणि हिरे, शाही बग्गी अजूनच महालाची सुंदरता वाढवतात.
जय विलास पॅलेस बांधण्यामागे एक उद्देश होता. तो म्हणजे वेल्सचे राजकुमार किंग एडवर्ड यांचा भारत दौरा. त्यांच्या भव्य स्वागतासाठी या पॅलेसची निर्मिती करण्यात आली होती, असं तज्ज्ञ सांगतात. आज या जय विलास पॅलेसच्या ट्रस्टी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नी प्रियदर्शनीराजे शिंदे आहेत. पॅलेसच्या सर्व देखभालीकडे त्या लक्ष देतात. या महालामध्ये आजही जुने नक्षीकाम तसेच आहे. अनेक जुन्या दुर्मिळ वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Ajit Pawar : अजित पवारांनीच सांगितलं कधी पडणार भाजप-शिंदेंचं सरकार, आकडेवारी देत केला खुलासा
Marriege Essay : लहान मुलाने लग्नावर लिहिला भन्नाट निबंध, पाहून शिक्षीकेलाही फुटला घाम; म्हणाली, ‘तु मला येऊन भेट’
Rohit Sharma : रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला, ‘या’ खेळाडूने ४२ चेंडूत ठोकले नुसते चौकार आणि षटकार; केल्या २६८ धावा