rohit sharma record break ali brown | क्रिकेटविश्वात रोज मोठे रेकॉर्ड होत असतात काही रेकॉर्ड हे मोडणं शक्य असते तर काही रेकॉर्ड मोडणे अशक्य. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावरही मोठमोठे रेकॉर्ड आहे. तसेच त्याच्या २६४ धावांचीही अनेकदा चर्चा होत असते. पण तुम्हाला माहिती आहे का वनडेमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदांजांमध्ये रोहित पहिला नाहीये.
इंग्लंडच्या ब्राऊन अलीच्या नावावर वनडेमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने वनडेमध्ये २६८ धावा केल्या होत्या. म्हणजे रोहित शर्माने जर फक्त पाच धावा देखील जास्त केल्या असत्या तरी तो वनडेमध्ये सर्वात जास्त धावा करणारा पहिला खेळाडू ठरला असता.
सर्रेकडून खेळणाऱ्या अली ब्राउनने २००२ मध्ये हा विक्रम केला होता. ग्लॅमॉर्गनविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ब्राउनने १६० चेंडूत ३० चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने २६८ धावा केल्या. ओव्हलच्या या ऐतिहासिक मैदानावर केलेल्या या विक्रमादरम्यान, ब्राऊनने सर्वाधिक १६७.५० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
ओव्हलवर खेळला जाणारा लिस्ट ए सामना केवळ अली ब्राउनसाठीच नाही तर ग्लॅमॉर्गनच्या शतकवीर आर क्रॉफ्ट आणि डी हॅम्पसाठीही ओळखला जातो. या सामन्यात विक्रमी ८६७ धावा झाल्या. या सामन्यात सर्रे संघाने प्रथम फलंदाजी केली होती. आयजी वॉर्ड आणि अली ब्राउन यांनी सलामीवीरांची भूमिका निभावली होती.
दोघांनी ग्लॅमॉर्गनच्या गोलंदाजांना धु धु धुतलं होतं. ९७ धावा करणाऱ्या वॉर्डची पहिली विकेट पडली तोपर्यंत संघाने २८६ धावा केल्या होत्या. यानंतर ब्राऊनने धावसंख्या पुढे नेण्यास सुरुवात केली. या सामन्यात सर्रेने ४३८ धावा केल्या होत्या आणि ४३९ धावांचे मोठे लक्ष्य विरोधी संघाला दिले होते.
४३९ धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर ग्लॅमॉर्गनच्या फलंदाजांनीही दमदार सुरुवात केली. कर्णधार क्रॉफ्टने थॉम्ससोबत पहिल्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. थॉम्स आऊट झाल्यानंतर त्याने सर्रेच्या गोलंदाजांना घामाघूम केलं होतं. हेम्पनेही ८८ चेंडूंत दहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. डेलने ४९ आणि एस थॉमसने ४१ चेंडूत ७१ धावा केल्या. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. या सामन्यात सर्रेने ९ धावांनी सामना जिंकला होता.
महत्वाच्या बातम्या-
health : सुहागरात्रीला ग्लासभर दूध पिण्याची प्रथा का आहे? यामागचे वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल
pune : ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा! पुणेकर तरूणाची बसमध्ये बोंबाबोंब, वाचा व्हायरल व्हिडीओमागचं सत्य
BJP: शिंदे गटामुळे भाजपला पडणार खिंडार? सांगलीचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजप विरोधातच करणार आंदोलन