shivsena : अंधेरी पूर्वपोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणखीनच टोकाला गेल्याच पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जातं आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.
तसेच दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. असलं असलं तरी देखील नेमकं काय होणार? हे निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल. अशातच शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी ऋतुजा लटके यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे आता आणखीनच वातावरण तापलं आहे.
वायकर यांनी माध्यमांशी बोलताना मतांच गणित सांगितलं आहे. वायकर म्हणाले, एकेकाळी अंधेरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. रमेश लटके २ टर्म आमदार झाले. ३१ टक्के मते शिवसेनेची, २८ टक्के काँग्रेस आणि २५ टक्के मते भाजपाची आहेत. बाकीचे मनसे इतर पक्षांची आहेत. ६५ टक्के मते एकाबाजूला जाणार आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.’
तसेच पुढे बोलताना वायकर म्हणाले, ‘या अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय होणार असून समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल,’ असं वायकर यांनी स्पष्टच सांगितलं आहे. एवढच नाही तर, ६५ टक्क्यांहून अधिक मतदान लटकेंना होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपवर निशाणा साधताना वायकर यांनी म्हंटलं आहे की, किती रडीचा डाव खेळतायेत हे जनतेला दिसतंय. सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून जोरदार आरोप केले जातं आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून देखील जोरदार आरोप करण्यात येतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी चूक; प्रसिद्ध लेखकाला जिवंतपणीच वाहीली श्रद्धांजली
sharad pawar : बारामतीच्या जाणता राजाने हात लावला तर राख होते; पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत, मशाल चिन्हही हातातून जाणार? प्रकरण उच्च न्यायालयात