eknath shinde : राज्यातील राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. विरोधी बाकावरील नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने विरोधकांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात सत्तांतर होताच विरोधकांनी सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. यामुळे शिवसेनेला गळती लागल्याच चित्र पाहायला मिळत आहे. पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे हे कसून प्रयत्न करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला लागलेली गळती थांबविण्यासाठी शिवसेनेने प्रबोधन यात्रेची आखणी केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटातील नेते शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल चढवत आहेत. थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लक्ष करत आहेत.
हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतीच नवी मुंबईत शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी या सभेदरम्यान बोलताना शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ओपेन चॅलेंज दिलं आहे. “हिंमत असेल तर समोरा समोर या”, असं आवाहन विचारे यांनी दिलं आहे.
याबाबत बोलताना विचारे म्हणाले, ‘शिंदे गटात या नाहीतर पोलिसांच्या मार्फत नोटीस देण्यात येतात. काहींना तडीपार करण्यात तर, काहींवर गुन्हे दाखल करण्यात आलं. तुमच्या हिंमत असेल तर समोर समोर या ना. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कशाला त्रास देता?.’
दरम्यान, ‘शिंदे गटात येण्यासाठी धमकी दिली जात आहे. मात्र, या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. उपजिल्हाप्रमुखावर सुद्धा केसेस दाखल केल्या आहेत. दिघ्यातील मेळाव्यात उपस्थित राहिल्याबद्दल शिवसैनिकांना नोटीस देण्यात आल्या. काय चालवलं, कोणाला त्रास देत आहे, अशी विचारणा विचारे यांनी केली.