Share

BCCI ने केला सौरव गांगुलीचा अपमान, अध्यक्षपदावर कायम राहण्याची इच्छा असूनही हकालपट्टी

saurav gangully

saurav gangully reject bcci offer | भारतीय क्रिकेट मंडळाच्या निवडणूकीत रोज वेगवेगळे ट्विस्ट येताना दिसत आहे. सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहणार नाही. हे जवळपास निश्चित झाले आहे. १९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

सचिवपदी जय शाह हे कायम राहणार आहे. तर अरुण धुमाळ हे खजिनदारपद भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कामावर बीसीसीआय खुश नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन काढलं जातंय असेही म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली यांना इंडियन प्रिमियर लीगच्या (IPL) चेअरमनपदाची ऑफर दिली होती. पण सौरव गांगुली यांनी ती ऑफर स्वीकारण्यास नकार दिला आहे. सौरव गांगुली यांना खालचे पद नको असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदावर निवड होण्याची शक्यता होती. पण ते पदही त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.

सौरव गांगुली यांना आयपीएलच्या चेअरमनपदाची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर त्याखालील पद भूषवण्याची इच्छा नाहीये. त्यांनी आपल्या अध्यक्षपदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्ती आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती.

गेल्या दोन तीन वर्षांपासून सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचे आणि जय शाह बीसीसीयआयच्या सचिव पदाचे काम पाहत आहे. २०१९ मध्ये सौरव गांगुली यांची अध्यक्षपदावर निवड झाली होती. कोरोना काळातही त्यांच्या नेतृत्वातच आयपीएल झाली होती.

सौरव गांगुली यांच्या अध्यक्षपदाखाली भारतीय क्रिकेट मंडळाने सुद्धा खुप प्रगती केली आहे. पण तरीही बीसीसीआय त्यांच्या कामावर खुश नसल्याची चर्चा आहे. तसेच ते आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुद्धा आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Raj Thackeray : महापालिका निवडणूकीत मनसे भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी जाहीर केला ‘हा’ निर्णय
विनायक राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधवांचा पाय खोलात; ‘या’ केसमध्ये पोलिसांनी केली कठोर कारवाई
Nana patekar : ‘टॅक्स भरूनही आमच्या चौकश्या होतात तुमच्या का नाही?’; नानांच्या रोखठोक सवालावर फडणवीस म्हणाले….

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now