Share

Eknath Shinde : मतदार म्हणून आम्हाला काही किंमत नाहीये का? नाना पाटेकरांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले…

nana patekar eknath shinde

nana patekar ask question to eknath shinde  | नुकताच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात अनेक गोष्टी चर्चेच्या ठरल्या आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी या सोहळ्यात हजेरी लावली. अशात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत घेतली आहे.

नाना पाटेकर हे स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडत असतात. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असे काही प्रश्न विचारले होते. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाना पाटेकर यांनी एक प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की मतदार म्हणून आम्हाला किंमत नाहीये का?

हा प्रश्न विचारताच सभागृहात लोकांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. त्यानंतर यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९ साली मतदारांचा जो सन्मान केला पाहीजे होता, तो आम्ही तीन महिन्यांपूर्वी केला. कारण मतदारांनी निवडणूकीत युतीला कौल दिला होता. आम्ही जनतेच्या मतांचा मान राखला आहे.

तसेच नाना पाटेकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आमची किंमत तुमच्या भरवश्यावर ठरत असते. तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? देवेंद्र फडणवीसांचे हे उत्तरही खुप हैराण करणारे होते. त्यांच्या या उत्तरावर अनेकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

तसेच यावेळी नाना पाटेकर यांनी आणखी एक प्रश्न विचारला होता. नाना पाटेकर म्हणाले की, महायुतीचं सरकार बनवायला अडीच वर्षे का लागली? यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. कोविडमुळे आम्हाला हा निर्णय घ्यायला उशीर लागला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला एक योग असतो. एखादी गोष्ट करायची असेल तर एक वेळ आणि काळ असतो. मध्यंतरी कोविड होता. त्या काळात असा काही निर्णय घेतला असता, तर आम्हालाच बोललं गेलं असतं. त्यावेळीही आम्ही आमच्या भावना सांगत होतो. पण आम्हाला यश आले नाही. त्यामुळे नंतर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.

महत्वाच्या बातम्या-
Amitabh Bachchan : ..तेव्हा मात्र मूग गिळून बच्चन गप्प बसला; मराठी अभिनेत्याने वाढदिवसादिवशीच अमिताभला सुनावले
Rutuja latke : अंधेरी पोटनिवडणूक: ‘या’ कारणामुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या मार्गावर
Aliens : ८ डिसेंबरला पृथ्वीवर उतरणार एलियन्स’; टाईम ट्रॅव्हरलच्या दाव्याने जगभरात खळबळ, कारणही सांगीतले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now