शिवसेना फुटल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. त्यातच आता जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. नाना पाटेकर यांनी यावेळी दोघांनाही रोखठोक प्रश्न विचारले.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंन्द्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. सध्या राजकीय वर्तुळात ही मुलाखत चर्चेचा विषय झाला आहे. यामध्ये नाना पाटेकर यांनी केलेल्या रोखठोक प्रश्नांना दोघांनीही उत्तरे दिली.
नाना पाटेकर म्हणाले, नगरसेवक निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्याधीश असतो. मला कळतं हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का नाही लक्षात येत? त्याची चौकशी का नाही होत? १०० रुपये कमावल्यानंतर मी ३० रुपये टॅक्स भरतोच, ३० रुपये तुम्ही जीएसटी घेताच. हे सगळं केल्यानंतर आमच्या चौकश्या होतात, तुमच्या का नाही होत? असा पाटेकर यांनी प्रश्न केला.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, भष्टाचार ही फक्त राजकारणच नाही तर संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील. भ्रष्टाचारासाठी जेलमध्ये जाऊन आलेले, अडकलेले लोक थम्पिंग मेजॉरिटीने जिंकून येतात. त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात, त्यातून समाजामध्ये भ्रष्टाचाराबाबत कोणताही तिरस्कार तयार होत नाही.
जोपर्यंत समाज चांगल्याला चांगला म्हणणार नाही, वाईटाला वाईट म्हणणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. गुन्हे केलेला निवडून येतो आणि साधा, सरळ स्वच्छ माणसाचं डिपॉझिट जप्त होत आहे. राजकीय नेते हे बदलू शकत नाही, समाजाला हे बदलावं लागेल, असं देवेन्द्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, नाना पाटेकर यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला. म्हणाले, ‘एकनाथराव नुसती मान हलवताय बोला जरा..’ नाना पाटेकर राजकीय नेत्यांकडून वापरण्यात येणाऱ्या अपशब्दांबाबत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी फक्त मान हलवली त्यामुळे नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
‘