Share

Optical illusions: ‘या’ फोटोमध्ये लपलेला बेडूक शोधणे जवळपास आहे अशक्य, ९९% लोकं झालेत फेल

Optical illusions, social media, photos/ गेल्या काही महिन्यांत ऑप्टिकल इल्युजनची (Optical Illusion) लोकप्रियता खूप वाढली आहे आणि नेटिझन्सना ते सोडवायला आवडते असे दिसून येते. हे खरं तर खूप मनोरंजक आहे. ही चतुराईने तयार केलेली चित्रे ज्या प्रकारे आपल्या मेंदूशी खेळतात ते खरोखरच रोमांचकारी आहे. ऑप्टिकल इल्युजन टेस्ट आपल्या मेंदूला फसवण्यासाठी आणि आपले निरीक्षण कौशल्याची शक्ती पडताळण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो शेअर केले जातात. यातील काही फोटो ऑप्टिकल इल्यूजन्स असतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या इल्यूजन्समुळे तुमचा मेंदू गोंधळून जातो आणि तुमच्या मेंदूला उत्तर शोधण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला लपलेला बेडूक शोधायचा आहे.

हा फोटो तुम्ही नीट पहा आणि बेडूक शोधण्याचा प्रयत्न करा. मात्र योग्य उत्तर शोधण्याआधी तुमच्या मोबाईलमध्ये टायमर नक्की सेट करा. अवघ्या 15 सेकंदात हे कोडे सोडवण्यात आणि लपलेला बेडूक शोधण्यात फार कमी लोकांना यश आले. हिरव्या पानांमध्ये हिरवा बेडूक शोधणे प्रत्येकासाठी सोपे नाही.

फोटो सतत बारकाईने पाहिल्यास योग्य उत्तर मिळू शकते. बेडूक शोधण्यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केले. मात्र योग्य उत्तर शोधण्यात काही प्रतिभावंत लोकच यशस्वी झाले. जर तुम्हाला या फोटोमध्ये लपलेला बेडूक दिसत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगतो. फोटोमध्ये लपलेल्या बेडकाचे लोकेशन जाणून घेण्यासाठी खाली दिलेला फोटो पहा…

या फोटोने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ऑप्टिकल इल्यूजन्स इतके मजेदार असतात की प्रत्येकाला ते सोडवणे आवडते. एवढेच नाही तर ते सोडवल्यानंतर लोक स्वतःला हुशार समजू लागतात. तुम्हीही हे कोडे सोडवले असेल तर तुमचे मन आणि डोळे विलक्षण तीक्ष्ण आहेत.

मेंदूचा व्यायाम करणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे. मेंदूचा जितका जास्त व्यायाम केला जातो तितका तो तेज होतो कारण माणसाला जेवढ विचार करायला भाग पाडले जाते तेवढा मेंदू काम करू लागतो. म्हणूनच तुम्ही अशा प्रकारची कोडी (ऑप्टिकल इल्युजन) सोडवीत राहायला हवी.

महत्वाच्या बातम्या-
Optical Illusions : ‘हा’ फोटो १० सेकंदात सांगेल तुमचा स्वभाव, तुम्ही बोलके आहात का लाजाळू? जाणून घ्या
Optical Illusions: या फोटोत सर्वात आधी तुम्हाला काय दिसतंय? चेहरा की उंदीर? यावरून ठरतो तुमचा स्वभाव, वाचा..
Optical Illusions: फोटोमध्ये लपलेला कुत्रा शोधला तर तुम्ही ‘जिनीअस’, ९९% लोकं झालेत फेल, डोकं चक्रावून जाईल

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now