King Cobra, Video, Social Media, Discovery Channels/ तुम्ही सर्वांनी डिस्कव्हरी चॅनल्सवर साप पाहिले असतील. कधी सापाच्या लढाईचे (Snake Fight) तर कधी सापाच्या बचावाचे व्हिडिओ सोशल मीडियावरही चर्चेत असतात. साप आणि मुंगसाच्या लढाईचे व्हिडीओ पाहायलाही अनेकांना आवडते. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक महिला अशा अवस्थेत अडकली आहे ज्याची कोणाला कल्पनाही करता येणार नाही. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक महिला (Female Snake Rescuer) बुटाच्या आत रॉड घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. बाईने रॉड बाहेर काढताच बुटातून एक धोकादायक किंग कोब्रा बाहेर पडतो आणि फणा काढतो.
सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा धोकादायक व्हिडिओ तुम्ही देखील पहा. ही महिला स्नेक रेस्क्युअर आहे, त्यामुळे ती सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. पण सापाला महिलेचा राग येऊ लागतो आणि साप महिलेवर हल्ला करतो. अनेकांना हा व्हिडीओ पाहणे भीतीदायक वाटेल.
अनेक वेळा किंग कोब्रा महिलेवर हल्ला करून विषय संपवण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रत्येक वेळी सापाला तोंडघशी पडावे लागते. व्हिडिओच्या शेवटी रॉडच्या साहाय्याने बुटातून सापाला बाहेर काढण्यात महिला यशस्वी होते. मात्र असे प्रयत्न सामान्यांनी करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
हा व्हिडिओ यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 53 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून अनेक सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले. या महिलेचे शौर्य पाहून अनेकजण हतबल झाले आहेत. मात्र अशाप्रकारे साप पकडण्यासाठी खूप प्रशिक्षण घ्यावे लागते आणि त्यानंतरही काही वेळा सर्प वाचवणारे सापाच्या कोपाचे बळी ठरतात.
महत्वाच्या बातम्या-
अजब प्रेम की गजब कहाणी! नागिणीच्या मृत्युनंतर नागाला बसला धक्का, केलं असं काही की…
५० हजारांहून अधिक सापांना वाचवणाऱ्या स्नेक मॅनच्या मांडीचा कोब्राने घेतला चावा; भयानक व्हिडिओ व्हायरल
तीन कोब्रांना एकाचवेळी हाताळत होता तरुण अन्…; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Snake: किंग कोब्रा अन् मुंगूसमध्ये जुंपली, कोण कोणावर पडतंय भारी? पहा खतरनाक व्हिडीओ