crime news : दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय प्रथमेशची मृत्यूशी झुंज अपयशी, अखेर सोडले प्राण

crime news : तब्बल दोन वर्षानंतर राज्यात मोठ्या आनंदात दहीहंडी, नवरात्र उत्सव, गणेश उत्सव हे सण साजरे झाले. करोना विषाणूमुळे मागील दोन वर्षे राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र यावर्षी दोन वर्षांची कसर काढण्यात आली आहे. सर्वच सणांमद्धे नागरिकांनी डबल आनंद साजरा केला.

काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठ्या आनंदात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. अनेक पथकांनी थरावर थर लावून आपली कला सादर केली. असं असलं तरी देखील अनेकांनी यामध्ये आपले जीव गमावले. हे सांगण्याच कारण म्हणजे, दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय प्रथमेशने अखेरचा श्वास घेतला आहे.

करीरोड येथील समर क्रीडा गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला होता. मनाला चटका लावून जाणारी बाब म्हणजे, केईएम रुग्णालयात या गोविंदावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, कार्डिएक अरेस्टमुळे या गोविंदाचं आज निधन झालं.

याबद्दल हॉस्पिटलच्या डीन डॉ. संगिता रावत यांनी माहिती दिली. प्रथमेशच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जातं आहे. याचबरोबर प्रथमेशच्या निधनामुळे करीरोड येथील दहिहंडी पथकावर शोककळा पसरली आहे.

वाचा नेमकं काय घडलं होतं..?
दहीहंडी पथकातील वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. याच अपघातात प्रथमेशच्या पाचव्या मणक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली होती. धक्कादायक बाब त्यातून प्रथमेशच्या कमरेखालील भागातील संवेदना बाधित झाल्या होत्या.

याच अपघातामुळे प्रथमेशला मणक्याच्या पॅरेलिसीसला सामोरे जावे लागले. प्रथमेश सावंत याचे आईवडील नसून त्याचा संभाळ मावशी वैशाली सावंत या करत होत्या. प्रथमेशने लहान वयातच आपली आई कॅन्सरने गमावली होती. लागोपाठच्या एका वर्षात त्याने वडिलांना कावीळ आणि बहीणीला एका अज्ञात आजाराने गमावले.

महत्वाच्या बातम्या-