nashik : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लक्झरी बस आणि टँकरमध्ये झालेल्या भीषण अपघाताने मोठी दुर्घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर लक्झरी बसने पेट घेतला. यात सुमारे 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांची ओळख पटविण्यात अद्याप डॉक्टरांना यश आलेलं नाहीये. मात्र मृतांचा आकडा वाढला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला. अपघात झालेली बस चिंतामणी ट्रॅव्हलची आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला. यवतमाळच्या पुसदहून खाजगी बस मुंबईच्या दिशेने येत होती. अन् त्यावेळी नाशिकजवळ या बसचा अपघात झाला.
अन् या अपघातानंतर बसमध्ये आग लागली. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये खासगी लक्झरी बसचा जळून कोळसा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या.
दरम्यान, बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर ज्यांना उतरता आले नाही ते प्रवासी प्रवासी बसमध्ये जळून खाक झाले. या आगीत बसमधील जवळपास सात ते आठ प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
या अपघातात मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 10 लोक जळून खाक झाले तर 34 जणांवर उपचार सुरू आहेत. १० मृत झाले असून सर्व पुरुष असल्याचे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्व: ता घटनास्थळी जाऊन भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. याचबरोबर जीव गेलेल्या १० प्रवाशांच्या वारसांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
lucknow : ४५ मिनिटांपासून सोसायटीची अडकली होती लिफ्ट, सीसीटीव्हीमध्ये जे समोर आलं ते पाहून अंगावर येईल काटा
Shivsena : ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे ठाकरे गट एकमेकांना भिडले, तुफान राडा, शेवटी निघाला ‘हा’ तोडगा
politics : महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी; ठाकरेंना शेवटची २१ तासांची मुदत, अन्यथा…






