Share

lucknow : ४५ मिनिटांपासून सोसायटीची अडकली होती लिफ्ट, सीसीटीव्हीमध्ये जे समोर आलं ते पाहून अंगावर येईल काटा

lift

boy playing with lift lucknow |अनेक मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये अशा काही घटना घडत असतात, ज्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडते. आता अशीच एक घटना लखनऊमधून समोर आली आहे. एक मुलगा आपल्या मित्राच्या घरी चाललो आहे सांगत घरातून निघाला होता. पण त्यानंतर तो तब्बल ४५ मिनिटं लिफ्टमध्येच थांबून राहीला होता. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसलं ते खुपच धक्कादायक होतं.

मुलगा जेव्हा खालच्या फ्लोअरवर येत होता. तेव्हा तो १६ व्या मजल्यावर लिफ्टला अडकवून खेळत बसला. याचा व्हिडिओ एका ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तो मुलगा आपल्या मित्रासोबत खेळताना दिसून आला. तो कधी लिफ्टचे बटण दाबत होता, तर कधी तो लिफ्टच्या आत-बाहेर करत होता.

काही वेळा तर तो लिफ्टच्या मध्यभागीच उभा राहायचा. हे खरंच खुप भितीदायक होतं, कारण त्याच्यासोबत दुर्घटनाही घडू शकत होती. कारण असं काही करताना मुलं लिफ्टमध्ये अडकण्याची किंवा मुलांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून सगळेच हादरले होते.

लिफ्टमध्ये अलार्म होता, सीसीटीव्ही होता. गार्ड रुममध्येही हे सगळं काही दिसत होतं. ऐकू सुद्धा येत होतं. पण त्या गार्डने लिफ्टचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं नाही आणि अलार्मही ऐकला नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मुलं खेळताना दिसून येणार आहे. यामध्ये एक मुलगा लिफ्टच्या आतमध्ये आहे, तर दुसरा मुलगा लिफ्टच्या बाहेर आहे. दोघेही लिफ्टसोबत खेळताना दिसून येत होते. असे करणे त्यांच्या जीवावरही बेतले असते. पण तेवढ्यात इतरांच्या लक्षात आले की लिफ्ट ४५ मिनिटांपासून १६ व्या मजल्यावर अडकलेली आहे.

विशेष म्हणजे गार्डच्या रुममध्ये या सर्व गोष्टी दिसतही होत्या. अलार्म सुद्धा वाजत होता.पण गार्डच्या निष्काळजीपणामुळे हा सर्वप्रकार घडला. त्यामुळे तिथल्या नागरिकांनीही खुप गोंधळ घातला होता. पण त्यानंतर हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या-
Shivsena : ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे ठाकरे गट एकमेकांना भिडले, तुफान राडा, शेवटी निघाला ‘हा’ तोडगा
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचा सत्तांतराचा गौप्यस्फोट शिंदे गटाने फेटाळला, केसरकरांनी केला मोठा खुलासा
Pune Police: ‘माझ्या वरच्या फ्लॅटमध्ये मोदींची हत्या करण्याबाबत प्लॅन सुरू आहे’, एका कॉलने पुणे पोलीस हादरले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now