shivsena : अंधेरी पोटनिवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंनी टाकला ‘हा’ खास डाव; वाचा काय आहे M2 समीकरण

shivsena : शिवसेनेसाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनत चालली आहे. अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र त्यांच्या विरोधात भाजप आपला उमेदवार उतरवेल. त्याला धोबीपछाड करण्याची रणनीती शिवसेनेने उत्तम प्रकारे आखण्यास सुरुवात केल्याचे दिसते.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेची बाजू अधिकच भक्कम या ठिकाणी झाली. तसेच निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या शाखांच्या नेटवर्कचा उपयोग करण्यासोबतच दारोदारी फिरून मतदारांच्या भेटी घेण्यावर शिवसेनेचा भर असणार आहे.

रमेश लटके हे मतदार संघात लोकप्रिय होते. त्यांचा मतदारांशी चांगला संपर्क होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना सहानुभूतीच्या लाटेमुळे चांगले मतदान होऊ शकते. या भागाच्या मतपेटीचा विचार करता, या भागात ख्रिश्चन मुस्लिम, शीख, भिख्यू, उत्तर भारतीय, मराठी, दलित अशी मिश्र लोकवस्ती आहे. हा कॉस्मोपॉलिटीन परिसर ओळखला जातो.

या भागातील ख्रिश्चन मतदार अनेक वर्ष काँग्रेसचे मतदार आहेत. काँग्रेसला मतदान करतात. मात्र काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरणार नसल्यामुळे हे मतदार मतदानासाठी बाहेर पडतील का? यावर बरेचसे गणित अवलंबून आहे. मात्र मुस्लिम मतदारांचा भाजपच्या ऐवजी शिवसेनेकडे ओढा दिसू शकतो.

यासाठी दसरा मेळाव्यातच उद्धव ठाकरेंनी डाव टाकल्याचे दिसते. सर्वसमावेशक हिंदुत्वाबद्दल बोलताना त्यांनी मोहन भागवतांनी संवाद करण्यासाठी मस्जिदीला भेट दिल्याचे सांगितले. तसेच २०१८ मध्ये दहशतवाद्यांनी औरंगजेब नावाच्या सैनिकाला ठार केले. तो देश सेवेसाठी शहीद झाला. तो आपल्या भावासारखा होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मागच्या काही काळात प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या भाजप पेक्षा मुस्लिम मतदारांना त्या ठिकाणी शिवसेना जवळची वाटू शकते. कारण तशी वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे मुसलमान व्यक्तींबद्दल सौम्य भूमिका घेणाऱ्या शिवसेनेकडे मुस्लिम बांधवांचा ओढा अंधेरीच्या निवडणुकीमध्ये दिसू शकतो. वंचित आघाडी आणि एमआयएमने यांनी उमेदवार न दिल्यास मुस्लिम मताचा टक्का शिवसेनेकडे या ठिकाणी वाढेल. भाजपला मात्र आपल्या स्टार प्रचारकांवर अवलंबून राहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या-
Tukaram Munde : रात्री रूग्णालयात हजर न राहणाऱ्या डाॅक्टरांना निलंबीत करणार; तुकाराम मुंडेंचा धडाका सुरू
shivsena : ३५ वर्ष घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले की घराला सोन्याचे पत्रे लावण्याएवढा मलिदा खाल्ला?; शिवसेना नेत्याचा शिंदे गटावर घणाघात
Amit Shah : ‘या’ दोन बड्या नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; दसरा मेळाव्यानंतर राजकीय हालचालींना वेग