Share

shinde group : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले तर ‘हे’ असणार शिंदे गटाचे नवे चिन्ह, आधीच केलीये पुढील तयारी

Eknath Shinde

shinde group : मागील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी अभूतपूर्व उलथापालथ झाली. शिवसेनेसारख्या आक्रमक, झुंजार पक्षामध्ये मोठी बंडखोरी घडून आली आणि पक्षामध्ये उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंनी ४० हून अधिक आमदारांना सोबत घेत बंड केले. एवढेच नव्हे तर भाजपसोबत जात नवे सरकार स्थापन केले. आणि त्याही पुढे जाऊन थेट धनुष्यबाण चिन्ह आपल्या गटाला मिळावे, असा अर्ज करत पक्षावर दावा ठोकला.

एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेत निवडणूक आयोगाकडे ‘धनुष्यबाण चिन्ह’ आपल्या गटाला मिळावे यासाठी अर्ज केला. त्यानंतर मात्र शिवसेनेत मोठी खळबळ माजली. उद्धव ठाकरेंनी सुद्धा ते चिन्ह आपल्याकडे राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले. केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हाबाबत निर्णय घ्यायचा अधिकार आहे, असे मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टाने याबाबत स्पष्ट केले.

आता निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण आहे. त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना पक्षाचे चिन्ह गोठवले जाऊ शकते. म्हणजेच धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात येऊ शकते, असे मत तज्ञांनी मांडल्यानंतर शिंदे गटाने नवीन चिन्हाबाबत तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

जर न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले गेले. तर शिंदे गटाचे नवे चिन्ह तलवार किंवा ढाल- तलवार असू शकते, याबाबत सूत्रांकडून संकेत मिळत आहेत. आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात बीकेसीवर शिंदे गटाकडून ५१ फुटाची भव्य तलवार पुजली जाणार आहे. त्यामुळे कदाचित तलवार किंवा ढाल- तलवार हे चिन्ह येत्या काळात दिसू शकते, असे यावरून बोलले जाते.

१९८९ रोजी शिवसेनेला धनुष्यबाण हे अधिकृत राजकीय पक्षाचे चिन्ह मिळाले. त्यापूर्वी बाळासाहेब वेगवेगळ्या चिन्हांवर आपल्या उमेदवारांना राजकीय मैदानात उतरवत असत. शिवसेनेचे उमेदवार कप बशी, तलवार, इंजिन या चिन्हांवर पूर्वी निवडणूक लढलेले आहेत. त्यामुळे आताही तो संदर्भ लक्षात घेत ‘तलवार’ हे चिन्ह शिंदे गटाचे पाहायला मिळाल्यास नवल वाटणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णया प्रक्रियेदरम्यान चिन्ह गोठवले जाऊ शकते, असे तज्ञ सांगतात. त्यामुळेच चिन्हाबाबत शिंदे गटाची ही चाचपणी सुरू असावी असे बोलले जाते. शिंदे गटाने मात्र याबाबत स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर अजून मांडलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-
Shinde group : शिंदे गटाच्या मेळाव्यात ‘या’ दिग्गज नेत्याची खुर्ची असणार रिकामी, चर्चांना उधाण
shivsena : शिंदे गटाचा मोठा दावा, आज शिवसेनेचे २ खासदार ५ आमदार शिंदे गटात जाणार, ठाकरेंना बसणार झटका
Shinde group : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यास मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now