politics : ‘यंदा शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीच संख्या जास्त असेल’

politics : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळावा घेण्यावरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. उद्धव ठाकरे समर्थकांकडून परंपरेनुसार शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याची जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडे शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटानेही बीकेसी मैदानावर दुसरा दसरा मेळावा घेण्याचा ठाम निर्धार केला आहे.

आमचाच दसरा मेळावा खरा आहे. आम्हीच खरी शिवसेना, असे सातत्याने शिंदे गटाकडून सांगितले जात आहे. मात्र खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची असून परंपरेनुसार शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा हाच शिवसेनेचा आहे. असे उद्धव ठाकरे समर्थकांकडून म्हटले जाते. या गोष्टीचे काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनीही समर्थन केले आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना मानत नाही. शिंदेंची शिवसेना खरी आहे, असे म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केली. तसेच यंदा शिवतीर्थावर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी असेल, असेही कदम म्हणाले.

दसरा मेळाव्याला गर्दी व्हावी म्हणून पेंग्विन सेनेने काँग्रेस राष्ट्रवादीकडे याचना केली. त्यामुळे यावेळी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची कार्यकर्त्यांची गर्दी असणार आहे. बॅनर्स लावले त्यात नवीन नाही. मात्र पक्षाचे आमदार, खासदार बाळासाहेबांच्या विचारांकडे निघून गेले आहेत. तरीही शिवसेना संपवू पाहणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सोबत उद्धव ठाकरेंना सोडवत नाही, अशी परखड टीका यावेळी राम कदम यांनी केली.

राम कदम पुढे बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असणाऱ्या व्यक्तीचा मानस होता की, शिवसेनेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करेन. शिवसेनेला मी संपवेन. त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आम्ही मानतो. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

दरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या बॅनर्स बाबतीत जणू स्पर्धा सुरू आहे. दोन्ही गटांकडून जोरदार बॅनरबाजी दसरा मेळाव्याबाबत केली जात आहे. मात्र मातोश्री बाहेर लागलेल्या राष्ट्रवादीच्या एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले. या बॅनरवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील तसेच उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेचे फोटो झळकले. या बॅनरवर एक संघटना, एक विचार, एकच मैदान. शिवसेनेचा दसरा मेळावा.. परंपरा अखंडित राहो ,असे म्हणत राष्ट्रवादीने शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
KL Rahul: माझ्याऐवजी ‘या’ खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळायला हवा होता, के एल राहुलच्या वक्तव्याने चाहतेही झाले हैराण
shinde group : मुख्यमंत्री शिंदे तोंडावर पडले! दुपारी शिंदे गटात, संध्याकाळी मातोश्रीवर? वरळीतील राजकीय ड्राम्याबाबत धक्कादायक खुलासा
PFI : राज्यात पीएफआय कार्यकर्त्यांना दिलं जात होतं दहशतवादी प्रशिक्षण? एटीएसचा धक्कादायक खुलासा